जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव ग्रा.पं.निवडणूक,सरपंच पदासाठी..इतके तर सदस्य पदासाठी…अर्ज !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक शिमगा सुरु झाला असून आज नामनिर्देशन भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी १६ नामनिर्देशन पात्र दाखल झाले आसल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात सरपंचपदासाठी कोळपेवाडी येथून-१,डाऊच खुर्द मधून-१ तर सोनेवाडी मधून २,बहादरपूर येथील-१ असे-५ अर्ज दाखल झाले आहेत.तर सदस्य पदासाठी वेस-सोयगाव येथील-१,कोळपेवाडीतून सर्वाधिक-८,सोनेवाडीतून-७ असे एकूण-१६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी नुकतीच केली आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसह ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येत आहेत.आज नामनिर्देशनपत्र दाखल होण्याचा दुसरा दिवस होता.
आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात सरपंच पदासाठी कोळपेवाडी येथून १,डाऊच खुर्द मधून १ तर सोनेवाडी मधून २,बहादरपूर येथील १ असे ५ अर्ज दाखल झाले आहेत.तर सदस्य पदासाठी वेस-सोयगाव येथील-१,कोळपेवाडीतून सर्वाधिक-८,सोनेवाडीतून -७ असे एकूण-१६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

सदर अर्जाची छाननी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होणार असल्याने आता कोपरगाव तालुक्यातील राजकीय पक्षांनी आपले घोडे त्यांचे खोगीर बाहेर काढले असून नाल,मेख,तंग तोबरा,बारुद तयारी सुरु केली असून आपल्या सरदार,दरकदार,बारगिरांना ताकीद फर्मावली आहे.त्यामुळे आता ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापसास प्रारंभ झाला आहे.कोपरगाव तालुक्यात पारंपरिक काळे-कोल्हे हे गट आमने सामने असून त्याच बरोबर राजेश परजणे यांचा एक गट कार्यरत असून उद्धव शिवसेनेचा गटाने निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे.आता बाळासाहेब सेना कोपरगावात नावापुरती असल्याने त्यात काही नवीन घडण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close