जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील…या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यात आणि नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारीत अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंच वार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आज पासून उमेदवारी भरण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तीर्थ निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे.

या निवडणुकीत नामनिर्देशन भरण्याची मुद्त दि.२० जून ते २४ जून सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे पर्यंत आहे.प्राप्त नांमनिर्देशन पत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक त्याच तारखेला दुपारी ०४ पर्यंत आहे.नामनिर्देशन पत्र छाननी दि.२७ जून रोजी सकाळी ११ वाजता असून ती संपेपर्यंत सुरु राहणार आहे.विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक २८ जून ते १२ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे पर्यंत राहणार आहे.अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.तर आवश्यक वाटल्यास मतदान करण्याचा दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०५ वाजे पर्यंत राहणार आहे.मत मोजणी दि.२५ जुलै रोजी सकाळी ०९ वाजता संपन्न होणार आहे.

सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील २५ जिल्ह्यांमधील ८९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे आदेश काढले आहेत.त्यात सोलापूरसह मुंबई,सांगली,सातारा,कोल्हापूर,पुणे, परभणी,जालना,औरंगाबाद,नांदेड,बीड,उस्मानाबाद,लातूर,धुळे,यवतमाळ,बुलढाणा,अकोला, अमरावती,वाशिम,नागपूर,नंदूरबार,अ,नगर,नाशिक या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांचा समावेश आहे.त्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्यासह संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचा ही समावेश असल्याची विश्वसनींय माहिती हाती आली आहे.
दरम्यान कोरोनामुळे या सहकारी संस्थांची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया घेता आली नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बहुतेक जिल्हे कोरोनामुक्‍त झाले आहेत.त्यामुळे सहकार प्राधिकरणाने ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश काढले आहेत.०१ एप्रिल २०२२२ पर्यंत पात्र असलेल्या सभासदांची प्रारुप यादी पुढील महिन्यात तयार केली गेली असल्याची माहिती हाती आली आहे. या निवडणुकीचा टप्पा तीन महिन्यांचा आहे.त्यामुळे एप्रिल महिन्यात प्रारुप मतदार यादी तयार होऊन ती अंतिम झाली आहे.मे महिन्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन मतदान होऊन जूनमध्ये म्हणजेच या माहिन्याखेर त्या सहकारी संस्थांवर नवीन संचालक मंडळ येणार आहे.

दरम्यान संजीवनी सहकारी साखर कारणखानायची निवडणूक एक दिवस पुढे राहणार असल्याची माहिती आहे.एरवी प्रत्येक बाबीत प्रसिद्धी हा या नेत्यांचा श्वास रहात असला तरी हि निवडणूक अत्यंत गोपनीय रित्या संपन्न होत आहे हे विशेष !

दरम्यान या निवडणुकीत नामनिर्देशन भरण्याची मुद्त दि.२० जून ते २४ जून सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे पर्यंत आहे.प्राप्त नांमनिर्देशन पत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक त्याच तारखेला दुपारी ०४ पर्यंत आहे.नामनिर्देशन पत्र छाननी दि.२७ जून रोजी सकाळी ११ वाजता असून ती संपेपर्यंत सुरु राहणार आहे.विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक २८ जून ते १२ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे पर्यंत राहणार आहे.अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.तर आवश्यक वाटल्यास मतदान करण्याचा दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०५ वाजे पर्यंत राहणार आहे.मत मोजणी दि.२५ जुलै रोजी सकाळी ०९ वाजता संपन्न होणार आहे.मतमोजणीचा निकाल लगेच मतमोजणी पूर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी जाहीर केली आहे.

या निवडणुकीत सर्वसाधारण जागा १५ असून त्यात प्रत्येक मतदारसंघात तीन जागा निवडून द्यावयाच्या आहे.त्यात मंजूर,माहेगाव देशमुख,पोहेगाव,चांदेकसारे,धामोरी आदी गट आहेत.याशिवाय उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदानी निवडून द्यावयाचा प्रतिनिधी,अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी,महिला प्रतिनिधी,इतर मागास वर्ग,भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतेकी एक जागा अशा एकूण २१ जागा निवडून द्यावयाच्या आहेत.दरम्यान संजीवनी सहकारी साखर कारणखानायची निवडणूक एक दिवस पुढे राहणार असल्याची माहिती आहे.एरवी प्रत्येक बाबीत प्रसिद्धी हा या नेत्यांचा श्वास रहात असला तरी हि निवडणूक अत्यंत गोपनीय रित्या संपन्न होत आहे हे विशेष !

हि निवडणूक हे प्रस्थापित नेते बिनविरोध घेणार हे उघड असून त्यासाठी आक्रमक सभासद काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
निवडणूक कार्यस्थळ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय हे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची पतपेढी गोतमनगर येथे राहणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close