जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

लायन्स क्लब ऑफ निफाड,कोळपेवाडीची घोषणा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लायन्स क्लब कोपरगावच्या कोपरगावात नव्यानेच सुरू झालेल्या कातकडे परिवाराच्या चॅरिटेबल संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या हॉल मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत लायन्स क्लब ऑफ निफाड चार्टर प्रेसिडेंट जयश्री भटेवरा व लायन्स क्लब ऑफ कोळपेवाडी चार्टर प्रेसिडेंट म्हणून मयूर सारडा यांची निवड मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आल्याचे सत्येन मुंदडा यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.

विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची (क्लबांची) जगातील सर्वांत मोठी संघटना. तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’ असे असले, तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’ ह्या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे.

लायन्स क्लब कोपरगावच्या लायन्स डायलिसिस सेंटर च्या उदघाटन प्रसंगी प्रांतपालला अभय शास्त्री व कॅबिनेट सेक्रेटरी परमानंद शर्मा यांनी क्लब अध्यक्ष सुधीर डागा व मनोज कडू यांना सेवकार्याबद्दल सन्मानपत्र देऊन क्लबच्या संदीप रोहमारे,संदीप कोयटे,राजेश ठोळे,शैलेंद्र बनसोडे,अभिजित आचार्य,डॉ उंबरकर,राम थोरे,आनंद ठोळे व सर्व सदस्यांचे कौतुक केले आहे .

कोपरगाव लायन्स क्लबने आत्तापर्यंत ९ कायमस्वरूपी प्रकल्प उभारून गरजवंतांच्या सेवा करून सम्पूर्ण प्रांतात नावलौकिक मिळवला असल्याचे सांगून राजेंद्र शिरोडे, बाबा खुबाणी, लायनेस किरण डागा,लिओ रोहित पटेल यांचे सह सर्व सदस्यांचे योगदानाबद्दल आभार मानले आहे.

निफाड क्लब सुरू करण्यासाठी ला.सौ.हिना ठक्कर यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल व निफाड आणि कोळपेवाडी परिसरात विविध सेवकार्ये करण्यास कोपरगाव क्लब सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सुधीर डागा यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी क्लबने जागेबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोपरगाव येथील उद्योजक सुधीर सोहनलाल बज परिवाराने चक्क १५ गुंठे जागा देणगी स्वरूपात देण्याची घोषणा केल्याने सर्वत्र त्यांचे विशेष कौतुक होत आहे .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लिओ प्रसाद कातकडे व एस.जे.एस.हॉस्पिटलचे श्री जानवेकर सर व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close