जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील निवडणुक मतमोजणीसाठी प्रशासन तयार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुक मतमोजणी करिता प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून तहसिल कार्यालयात २९ ग्रामपंचायतींची स्वतंत्रपणे एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

उमेदवाराचा विजय किंवा पराभव झाल्यास तो शांततेच्या मार्गाने स्वीकारून आपणाकडून अथवा आपल्या समर्थकांकडून सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.फटाके वाजविणे,गुलाल उधळणे यावर प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर असणार आहे-दौलतराव जाधव,पोलीस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत मतमोजणी करिता तहसिल कार्यालय परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.शामियाना अंतर्गत ग्रामपंचायत निहाय २९ मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे.मतमोजणी सकाळी ९:०० वाजता सुरू होणार आहे.मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी या पैकी एकाला ओळखपत्र धारक असल्याची खात्री करुन प्रवेश दिला जाणार आहे.२९ ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रीयेत प्रत्येक ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आली असून त्यांचे मदतीला विविध खात्यांचे अधिकारी सहाय्यक म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच प्रसार माध्यमांना स्वतंत्र कक्ष तयार आला आहे.मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पहानी केली आहे.मतमोजणी केंद्रावर प्रवेशासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला असून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी त्यांचे वाहने शक्यतो आणणे टाळावे किंवा तहसिल मैदानावर सुस्थितीत पार्किंग करावी.तसेच प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर कामकाज पहाणारे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच मतमोजणी दरम्यान आलेल्या सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मतमोजणी करिता आलेल्या प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घ्यावी. मतमोजणी केंद्रावर भ्रमणध्वणी आणण्यास मनाई करण्यात आला आहे.तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे जमाव बंदी आदेश लागू असून आपण किंवा आपल्या अनुयायी-कार्यकर्ते एकत्र येऊन घोषणाबाजी करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक व जातीय भावना दुखावतील असे कृत्य व भाष्य करणे टाळावे.तसेच एकत्र येऊन जमाव जमवून कोणत्याही प्रकारचा जल्लोष करु नये.कोरोना आजाराचे प्रादुर्भावामुळे एकत्र येण्यास व मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.नागरिकांनी प्रशासनाच्या वेळोवेळी मिळणा-या सुचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,शिर्डी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close