जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात ग्रामपंचायत निवडणूक, शिवसेना स्थानिक नेत्यांना अधिकार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात संपन्न होत असलेल्या २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आघाडीतील पक्षांना प्राधान्य दिले जाणार असून त्यात मेळ जमला नाही तर जे पक्ष आम्हाला जास्त जागा देतील त्यांच्या बरोबर आमचे शिवसैनिक सहयोगी पक्ष म्हणून काम करून जास्तीत जास्त जागा निवडून आणतील असा आशावाद कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलें आहे.

दरम्यान आमची शिवसेनेची युती महाविकास आघाडी बरोबर असल्याने त्यांच्याशीच बहुतांशी ठिकाणी युती होणार आहे.मात्र ज्या ठिकाणी स्थानिक अडचणी येतील त्या ठिकाणी कार्यकर्ते सक्षम असल्यास अपक्ष निवडणूक लढवली जाईल.व जेथे हि शक्यता नाही त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वतंत्र निर्णय घेऊ शकतील- राजेंद्र झावरे,जिल्हा प्रमुख शिवसेना उत्तर नगर जिल्हा.

राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणक जाहीर झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास नुकतीच २३ डिसेंबर सुरुवात झाली आहे.राज्यातील १५ जानेवारी रोजी मतदान; तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.२०२०-२१ च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे.त्यामुळे सरपंच आरक्षणाचा हा घोळ राजकीय व आर्थिक रसद पुरविण्यात नेमका अडचणींचा ठरत आहे.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी,भाजप,मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुकांचा हा शिमगा भलताच रंगणार असल्याचे सार्वत्रिक चित्र असताना कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतीत तालुक्यातील राष्ट्रवादी (आ.काळे गट), भा.ज.प.(माजी आ.कोल्हे गट) यांची पारंपरिक लढत होणार असली तरी शिवसेना आणि मूळ भाजपचा नगराध्यक्ष विजय वहाडणे गट नेमकी काय भूमिका घेतो हा राजकीय क्षितिजावर औत्सुक्याचा विषय आहे.शिवसेना महाविकास आघाडीबरोबर असल्याने ते आ.आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर जाणार असेच चित्र राहण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांची भूमिका समजावून घेतली त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”तालुक्यात शिवसेनेची राजकीय ताकद निर्णायक असून शिवसेनेने अद्याप पर्यंत तालुक्यात दोनदा आमदारकी,लोकनियुक्त नगराध्यक्ष पद,जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती आदी ठिकाणी जागा मिळवून दाखवल्या आहे.लोकसभेत तीनदा बहुमत देऊन आपली राजकीय ताकद मुंबईतील मातोश्री पर्यंत दाखवून दिली आहे.वर्तमानात शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे विराजमान असल्याने राज्यात व तालुकानिहाय व गावनिहाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या अपॆक्षा वाढणे स्वाभाविक आहे.व तसे शिवसेनेने मुंबई येथून जाहीरही केले आहे.त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला आपली गावपातळीवर ताकद दाखविण्याची हि नामी संधी असल्याचे मानले जात आहे.व ते वावगे नाही.तथापि साखर सम्राटांच्या या तालुक्यात आजपर्यंत अनेकांनी पदे मिळवले आहे.मात्र त्याचा सामान्य शिवसैनिकाला फारसा फायदा झालेला नाही हे वास्तव नाकारता येणार नाही.त्यामुळे आजही शिवसैनिक आर्थिक दृष्ट्या कार्यक्षम आहे असे म्हणणे धाडसाचे मानावे लागेल.त्यामुळे शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तशी क्षमता नाही हे वास्तव आहे.व ते अव्हेरण्यात काही गमक नाही.वास्तव स्वीकारून पुढे जाण्यात काही पदरात पडण्याची शक्यता असते.उगीच मृगजळामागे जाण्यात काही हशील नाही.याचे आम्हाला पदाधिकाऱ्यांना भान आहे.त्यामुळे आम्ही नुकतीच निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच विरा पॅलेस येथे कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली असून त्यात काही निर्णय घेतले आहे.त्यात प्रमुखपणे आम्ही तालुक्यात महाआघाडीतील पक्षांना प्राधान्य देऊन जो पक्ष आम्हाला ग्रामपातळीवर जास्त जागा देईल त्याच्या बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.व तसे अधिकार पाच संपर्क प्रमुख यांची नेमणून करून त्यांना या बाबतीत लक्ष देण्यास सांगितले आहे.ग्रामपातळीवर असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिले आहे.त्यामुळे ग्रामपातळीवर त्यांना सोयीचा जो पक्ष वा गट असेल त्या बरोबर जाण्यात त्यांना परवानगी दिली आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेले सेनेचे स्थान अधिक पक्के होण्यास मदत मिळणार आहे.व त्यांना त्या पातळीवर त्यांना निवडणूक लढवणे सोपे जाणार आहे.

दरम्यान कोकमठाण ग्रामपंचायत पातळीवर जागा वाटप ठरले असून त्या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेना यांना प्रत्येकी १०-०७ जागा वाटप ठरले आहे. व सरपंच पद शिवसेनेस दोन वर्ष मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल लढवला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close