जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

एकीकडे लाडकी बहिण योजना तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार-…या नेत्याची टीका !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

राज्यात लाडक्या बहिणीची घोषणा करून राज्यातील महायुतीने मतदानाची व्यवस्था केली असून दुसरीकडे लाडकी बहिण योजना राबवायची तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांवर अत्याचार होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नुकतीच केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अलोट गर्दीने कोपरगाव विधानसभा मतदार संघात राजकीय चित्र बदलून जाणार असल्याचे वाटू लागले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.या सभेची व त्यांचे उमेदवार संदीप वरपे यांची चर्चा सर्वदूर पसरली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- २०२४ ची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी पवार गटाच्या दोन्ही बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांची प्रचार सभा आज सायंकाळी ५.४५ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,खा.भास्कर भगरे,रयत शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे,काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,शिवसेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास वहाडणे,प्रमोद लबडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,ताराचंद म्हस्के, प्रा.नितेश कराळे,दिपक साळुंके,सेनेचे शहरप्रमुख सनी वाघ,राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बापूसाहेब रांधवने,ऍड.दिलीप लासूरे,जितेंद्र रंनशुर,
आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

निळवंडे धरणाचे भूमिपूजन पवार साहेब आपण केले आहे.त्याला आपल्या महाआघाडी सरकारने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १०५६ कोटी निधी दिला आहे.त्याला दुष्काळी १८२ गावांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने लाठ्या काठ्या खाल्या,जेलमध्ये गेले,उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले लढा यशस्वी केला त्यांना मोठा त्रास झाला त्यांचे कुठे नाव घ्यायचे नाही.त्यांनी न्यायिक लढा दिला.म्हणून पाणी आले.आणि पाणी आल्यावर जलपूजन करायला या.आ.आशुतोष काळे हे सर्वात पुढे आले यावर संदीप वरपे यांनी सडकून टीका केली आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० खासदार निवडून द्या अशी मागणी करत होते.आम्ही दिल्लीत विचार केला की,४०० पार जागा का हव्या आहेत.तेंव्हा लक्षात आले की त्यांना संविधान बदलायचे आहे.त्यांचे खा.हेंगडे यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला घटना बदलायची आहे.आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक केली व या धोक्याची ओळख करून दिली.राज्यात लाडक्या बहिणीची घोषणा करून मतदानाची व्यवस्था केली आहे असा आरोप केला आहे.एकीकडे लाडकी बहिण योजना राबवायची तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार चालू आहे.शाहू,छ्त्रपती शिवाजींच्या राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे.त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे उदाहरण देऊन राज्यात महिलांच्या सन्मान राखण्याची संरक्षण देण्याची गरज आहे.त्या बाबत राज्य सरकार कमी पडले असल्याचा आरोप केला आहे.
   शेतकऱ्यावर बोलताना ते म्हणाले की,”शेतकरी घाम गळतो पण त्याच्या घामाचे दाम मिळत नाही तो आत्महत्या करत आहे.त्यासाठी त्यांनी यवतमाळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे उदाहरण दिले आहे.आगामी काळात आमच्या सरकारने कर्जमाफी करण्याची तयारी केली आहे.आज सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्या हाती सत्ता नाही त्यासाठी राज्याची सत्ता द्या.कोपरगाव विधानसभा मतारसंघातील उमेदवार संदीप वर्पे यांना निवडून द्या.राज्याचा चेहरा-मोहरा आम्ही बदलून दाखवू असे आश्वासन दिले आहे.सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय शैक्षणिक दुरवस्था झाली होती.त्या ठिकाणी आपण संदीप वर्पे यांची नियुक्ती केली आम्ही त्याची दुरवस्था दूर केली आहे.आ.आशुतोष काळे यांना निवडून आणले त्यांना साई संस्थानचे अध्यक्षपद दिले.त्यास राज्यमंत्रीपद दर्जा दिला पण त्यांनी त्यांची जाणीव ठेवली नाही.ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे असो म्हणुन आगामी काळात संदीप वर्पे यांना निवडून द्या असे आवाहन केले आहे.कोपरगाव तालुक्याचा पूर्वी चांगला लौकिक होता तो वर्तमान नेत्यांनी आता बदलला असून संदीप वर्पे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.त्याच्या पाठीशी आपण खंभिरपणे उभे राहू असे आवाहन केले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक संदीप वर्पे यांनी केले
त्यावेळी ते म्हणाले की,”आपण आधी माजी राजेंद्र झावरे यांचे नाव सुचवले होते असे सांगून आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आदींचे सहकार्य केले आहे.आपल्या बातम्या देऊ नये यासाठी तालुक्यातील पत्रकारांवर मोठा दबाव असल्याचे सांगून पत्रकारांनी आपल्या बातम्या बंद केल्याचा आरोप केला व शेवटी त्यांची चूक नाही अशी सारवासारव केली आहे.फ्लेक्स परवाना घेऊन लावताना अंनत अडचणी आणल्या ग्रामसेवक बाहेर पळून गेले असल्याचा आरोप केला आहे.माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात माजी मंत्री कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.आता शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहे.ही निवडणूक एकतर्फी असेल तर मतदार संघ सोडून दाखवा आमचे आ.काळे यांना आव्हान दिले आहे.एका सामान्य शिक्षकाच्या मुलाने तुमच्या पुढे आव्हान निर्माण केले आहे यातच सर्व आले आहे असे सांगून त्यांनी आ.काळे यांच्या कालखंडात रस्त्यांचे काम निकृष्ट केले आहे त्यावर नागरिकांची व प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असल्याचा आरोप केला आहे.ते तीन हजार कोटींच्या निधीतून शिर्डी विमानतळाचे दिड हजार कोटी त्यात धरता याला काय म्हणणार? देवाचे श्रेय तुम्ही घेत आहे.निळवंडे धरणाचे भूमिपूजन पवार साहेब आपण केले आहे.त्याला आपल्या महाआघाडी सरकारने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १२०० कोटी निधी दिला आहे.त्याला दुष्काळी १८२ गावांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने लाठ्या काठ्या खाल्या,जेलमध्ये गेले,उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले लढा यशस्वी केला त्यांना मोठा त्रास झाला त्यांचे कुठे नाव घ्यायचे नाही.त्यांनी न्यायिक लढा दिला म्हणून पाणी आले असे कालवा कृती समितीचे कौतुक केले मात्र निळवंडे धरणाचे पाणी आल्यावर जलपूजन करायला हे सर्वात पुढे आले यावर सडकून टीका केली आहे.(त्यात आ.बाळासाहेब थोरात,आ.राधाकृष्ण विखे यांचा ही समावेश आहे मात्र तो त्यानं सोयीस्कर टाळला आहे.)आ.काळे गोदावरी कालव्याचे पाणी यांनी घालवले आहे.कांदा भाव,सोयाबीन,ऊस,दूध दर कमी झाले यावर का बोलत नाही,दुग्ध मंत्र्यांचा लाडका आमदार असल्याने काहीच बोलत नाही असा एकेरी उल्लेख करून त्यांनी आता आपली बदनामी सुरू केली असल्याचं आरोप केला आहे.आपला ठेकेदाराचा परवाना आपण रद्द केला आहे.नोंदणीकृत व्यवसाय करायचा नाही का ? असा सवाल केला आहे.आ.काळे यांना विचारणा करताना तुमचा व्यवसाय काय आहे ? असा सवाल करून कोपरगाव गौतमी पाटील नाचवली तो खर्च कुठून केला याचा हिशेब द्यावा लागेल असा इशारा दिला आहे.जिरायती भागातील निळवंडे धरणाचे शेती सिंचनाचे पाणी शिर्डी कोपरगाव आदी शहरांना आणू नका असे आपण त्यांना सांगितले होते याची आठवण करून दिली आहे.कोपरगाव पाच क्रमांकाच्या तलावाचे ठराव आम्ही मंजूर केले आहे.नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोल्हे गटाचे नगरसेवक आदींनी मदत केली आहे.तलावाची माती उचलण्याचे काम आपण समृद्धी चे ठेकेदार रेड्डी यांचेकडून आपण करून दिली आहे.तलावाची जागा माजी आ.कोल्हे यांनी घेऊन दिली तळे कोठे केले असते असा सवाल केला आहे.स्व.खा.भिमराव बडदे यांनी जसा पराभव केला तसा आपण आ.आशुतोष काळे यांचा पराभव करणार असल्याची भिमगर्जना केली आहे.ज्यांची गरज लागणार त्यांची नंतर आठवण आली मग त्यांचे फोटो लावले आहे.विधानसभेचे  माजी सभापती ना.स.फरांदे यांचे फोटो का लावला नाही असा सवाल करून माळी समाजाशी जातीवाद करता का ? असा कडवा सवाल केला आहे.यांनी अनेक वेळा पक्षांतरे केली यांना कोणतीही विचारधारा नाही.शरद पवार साहेब तुम्ही आले नसते तर पराभव झाला असता याची आठवण करून दिली आहे.आगामी निवडणुकीत आपल्याला चॉकलेटचा वापर होणार आहे चॉकलेट खा पण तुटारीचे बटण दाबा असे आवाहन केले आहे.

  सदर प्रसंगी विरोधी पक्ष नेते आ.बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की,”कोपरगाव अनेक वेळा आलो पण प्रत्येक वेळी काळे-कोल्हे हेच ऐकायला भेटायचे पण आता पहिल्यांदा वर्पे आले आहे.ते शरद पवार यांचे खरे निष्ठावान आहे.तो तालुक्यासाठी नक्कीच चांगले काम करील.ही लढाई महायुती आणि महाआघाडीत होत आहे.आम्ही राज्यात महाआघाडीची पहिली कर्जमाफी केली आहे.राज्यात कोरोना काळात देशात सर्वाधिक चांगले काम केले आहे.

  सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले व लवकरच जातीवाद संपणार असल्याचे सांगितले आहे.लाडक्या बहिणीला आम्ही तीन हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले आहे.पवार साहेब यांनी ७० हजार कोटी रुपये माफ केले याची आठवण करून दिली आहे.आमचे सरकार येणार अशी चाहूल लागल्यावर त्यांना कर्जमाफी आठवली असल्याची टीका केली आहे.शेती मालाला आम्ही भाव देणार आहे.असे सांगून कोपरगाव शहराचा व समन्यायी पाणी प्रश्न,पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा असे आवाहन केले आहे.

   सदर प्रसंगी खा.भास्कर भगरे,प्रा.नितेश कराळे,नितीन शिंदे,शिवाजी ठाकरे,शिवाजीराव ढवळे,आदींनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार सेनेचे शहरप्रमुख सनी वाघ यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close