निवडणूक
…तर मला बोलवा,अन्यथा… !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
“तुम्हाला सोयीचे असेल तर मला आपल्या सभेला बोलवा अन्यथा नाही बोलवले तरी हरकत नाही” अशी कोपरखळी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वहाडणे यांनी एका बैठकी दरम्यान मारली असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचार पहिल्या टप्प्यात शिगेला पोहोचला आहे.कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चर्य महाविकास आघाडी आणि महायुतीने केला आहे.ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने तर थेट दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पाचारण केले आहे.आज ०८ नोव्हेंबर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांची जाहीर सभा झाली आहे.तर याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नाही.येथे ही तिरंगी लढत होत असून पवार घराण्यातील दोन राष्ट्रवादीत प्रमुख लढत होत असून त्यात थोरल्या पवारांकडून संदीप वपें तर धाकल्या पवारांकडून आशुतोष काळे हे निवडणूक लढवत आहे.तरी या लढतीत संजय काळे यांनी तिसरा त्रिकोण निर्माण केला आहे.परिणामी त्यांना निवडून आणण्याची खरी जबाबदारी जनतेवर आली आहे मात्र मतदार यात नापास झाले तर समाजासाठी काम करण्यासाठी कोणी धजावणार नाही हा भविष्य काळात वाढून ठेवलेला खऱ्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे.
दरम्यान प्रमुख तिन्ही उमेदवार आपल्या परीने निवडणूक लढवत असून यात महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या न निष्ठावान भाजप वहाडणे गटही तालुक्यात भाजप जिवंत ठेवण्यात महत्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही.त्यांनी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन नुकतेच ‘हॉटेल विरा पॅलेस’ या ठिकाणी केले होते.वहाडणे यांचे नगराध्यक्ष पदाच्या काळात त्यांच्या सहाय्याने आ.आशुतोष काळे यांनी पिण्याच्या पाच क्रमांकाच्या तलावाचा प्रश्न मार्गी लागला असताना त्यांना उद्घाटन प्रसंगी त्यांचेसह संत,महंत,मौलाना,बौद्ध भिख्खू आदींच्या प्रमुख कार्यकर्ते आदींना कोणासही बोलण्याची संधी काळे यांनी उपलब्ध करून दिली नव्हती.वहाडणे स्पष्ट बोलण्यात माहिर असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना निमंत्रित केले होते.त्यावेळी विजय वहाडणे बोलत होते.त्यामुळे या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते गणपतराव दवंडे हे होते.
सदर प्रसंगी माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,सतिष कृष्णानी,माजी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव,सुभाष दवंगे,प्रमोद पाटील सर,वाल्मीक भोकरे,छंनुदास वैष्णव,संजय कांबळे,चेतन खुबानी,किरण थोरात,वसंत जाधव,मधुकर वहाडणे,नवनाथ जाधव,भाऊसाहेब कासार,संजय कानडे,बाबासाहेब पाडेकर,दत्तात्रय दवंगे,बापुसाहेब बारहाते आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”त्यांनी दहा वर्षापूर्वी भाजप आणि माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली होती आता ती नाही असा खेद व्यक्त करत ती आताही मिळायला हवी अशी आशा व्यक्त केली आहे.मात्र अलीकडील काळात ती राहिली नाही.त्यात ते बाजार समिती,पंचायत समिती,नगरपरिषद,ग्रामपंचायत आदी ठिकाणच्या सत्तेत कार्यकर्त्यांना सहभागी करून घेत असत अशी भावना व्यक्त केली आहे.त्यावेळी त्यांनी स्व.खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी माजी खा.शंकरराव काळे हे अडचणीत असताना त्यांना मदत केल्याची आठवण करून दिली आहे व शेवटी त्यांनी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजय करण्याचे आवाहन केले आहे.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांनी व्यथा एकूण घेऊन त्यांना आश्वासन देऊन दिलासा दिला असल्याची माहिती आहे.
सदर बैठकीचे प्रास्तविक सुभाष दवंगे यांनी केले तर मनोगत वाल्मीक भोकरे,मधुकर वहाडणे,बापुसाहेब बारहाते,दत्तात्रय दावंगे,संजय कांबळे आदींनी व्यक्त केले आहे.तर शेवटी उपस्थितांचे आभार विनायक गायकवाड यांनी मानले आहे.