निवडणूक
कोपरगावात…इतके अर्ज अवैध !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी दाखल करण्यात आलेल्या २० इच्छुक उमेदवारांच्या ३० अर्जांची छाननी बुधवार दि.३० ऑक्टोबर रोजी पार पडली असून या छाननीत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे तर १९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके,सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत २० इच्छुक उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले.या अर्जांची छाननी बुधवारी झाली. यात किशोर मारोती पवार यांनी प्रस्तावकांचा तपशील व त्यांच्या स्वाक्षऱ्या अर्जामध्ये सादर केल्या नव्हत्या.त्यामुळे किशोर पवार यांचा एकमेव अर्ज अवैध ठरविण्यात आला.२९ अर्ज वैध ठरले आहे.बुधवारपासून अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली आहे.सध्या १९ इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत.४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.त्याच दिवशी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.त्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान आता निवडणुकीच्या रिंगणात आशुतोष आशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस,अजित पवार गट),संदीप गोरक्षनाथ वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार),शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी),शंकर सुकदेव लासुरे (राष्ट्रीय समाज पक्ष),महेबुब खान पठाण (बहुजन समाज पक्ष),बाळासाहेब कारभारी जाधव (अपक्ष ०३ अर्ज), शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी),प्रभाकर रावजी आहिरे (अपक्ष),संजय भास्करराव काळे (अपक्ष),विजय सुभाष भगत (अपक्ष), किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष), विजय सुधाकर जाधव (अपक्ष),दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष),विजय नारायणराव वडांगळे (अपक्ष),चंद्रहंस अण्णासाहेब औताडे (अपक्ष),राजेंद्र माधवराव कोल्हे (अपक्ष),मनिषा राजेंद्र कोल्हे (अपक्ष),विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष), खंडू गहिनीनाथ थोरात (अपक्ष) आदी उमेदवार शिल्लक राहिले आहे.