जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

राष्ट्रवादीच्या नामनिर्देशनाने,…या तरुणाचे भाग्य उजळले !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
 
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी संपत जात असताना विविध पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी घाई केली आहे.महाआघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आता अंतिम यादी जाहीर केली असताना त्यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवार संदीप गोरखनाथ वर्पे यांचा नामनिर्देशन अर्ज शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,दक्षिण नगरचे खा.नीलेश लंके,दिंडोरीचे खा.भास्कर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक अधिकारी सायली सोळंके  यांचेकडे दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान कोपरगाव विधानसभा निवडणुकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खास लक्ष असल्याची माहिती असून त्यासाठी त्यांनी आज महाआघाडीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,खा.नीलेश लंके,खा.भास्कर भगरे यांना जाणीवपूर्वक पाठवले असल्याची माहिती आहे.त्यामुळे ही निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै २०२३ मध्ये बंडखोरी झाली.अजित पवारांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्यासोबत घेऊन भारतील जनता पक्षाला समर्थन दिलं.त्यामुळे विरोधी बाकावरून ते थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले.दरम्यान,लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या.या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादींना अपेक्षित करामत दाखवता आली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर सोडण्यात आलं.त्यामुळे विधानसभेत अजित पवार सवत्या सुभ्याची भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं.परंतु,आम्ही महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर महायुतीत त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.तर दुसरीकडे अजित पवार यांची आपण घराच्या घरी सुप्रिया सुळे याचे विरुध्द लढत केल्याने त्यांनी पश्चाताप व्यक्त केला होता.त्यामुळे थोरले आणि धाकटे असे दोन्ही पवार एकत्र निवडणूक तर लढावणार नाही ना अशी शंका व्यक्त होत होती.मात्र आज अखेर ती साफ खोटी ठरली आहे.

  

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांना उमेदवारी मिळून त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.शेवटी शेवटी तरी काही चमत्कार होईल आणि कोल्हे अपक्ष लढतील असा अंदाज सपशेल फोल ठरला आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांना जड जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.

  राज्यातील जागा वाटप पार पाडले असून त्यात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा तिढा सुटला आहे.त्यात माजी आ.स्नेहलता कोल्हे व त्यांचे युवराज यांनी सपशेल माघार घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.तर त्या पलीकडे जावून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांना उमेदवारी मिळून त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.शेवटी शेवटी तरी काही चमत्कार होईल आणि कोल्हे अपक्ष लढतील असा अंदाज सपशेल फोल ठरला आहे.त्यामुळे संदीप वर्पे यांनी आज आपला अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे वर्पे या युवा शिलेदरावर त्यांनी खा.नीलेश लंके,भास्कर भगरे यांच्या सारखी सामान्य कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे शिर्डीत,दक्षिण नगर आणि दिंडोरीत जो मतपेटीतून चमत्कार घडला तो आता कोपरगाव विधानसभेत घडणार असल्याचे नागरिक बोलू लागले आहे.त्यामुळे आता त्यादिशेने चर्चेला सुरुवात झाली आहे.वास्तविक संदीप वर्पे यांचा ईशान्य गडाने अनेक वेळा राजकीय बळी घेतला असून त्याचा राजकीय वचपा काढण्याची संधी म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे नागरिक पाहत असल्याचे दिसत आहे.

   दरम्यान कोपरगाव विधानसभा निवडणुकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खास लक्ष असल्याची माहिती असून त्यासाठी त्यांनी आज महाआघाडीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,खा.नीलेश लंके,खा.भास्कर भगरे यांना जाणीवपूर्वक पाठवले असल्याची माहिती आहे.त्यामुळे ही निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे.

   सदर प्रसंगी सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,उबाठा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमूख कैलास जाधव,शहाराध्यक्ष सनी वाघ,माजी शहरप्रमुख भरत मोरे,कलविंदर दडियाल,दिपक साळुंखे,अस्लम शेख,माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे,योगेश बागुल,माजी तालुका उपप्रमुख गंगाधर रहाणे,राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बापू रांधवणे,किरण खर्डे,प्रवीण पोटे,आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


   दरम्यान सदर प्रसंगी प्रारंभी खा.भगरे यांनी विघ्नेश्वर येथील मंदिरात नारळ अर्पण करून रॅलीची सुरुवात केली होती.त्यानंतर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून गुरुद्वारा रोडने ही रॅली तहसील पर्यंत सकाळी ११.३० वाजता पोहचली होती.गुरुद्वारा जवळ त्यांना खा.भाऊसाहेब वाकचौरे व खा.नीलेश लंके येवून मिळाले होते.त्यानंतर मान्यवर मंडळीनी निवडणूक अधिकारी सायली सोळंके यांनी आपले नामनिर्देशन सुपूर्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close