जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

  …या नेत्यांची त्वरित हकालपट्टी करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     सन -२०१६ मधे आपण नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जिल्हा भाजपातील काहींनी माझ्यावर मोठे आकांडतांडव केले होते.परिणामी निलंबनाची कारवाई केली होती.मात्र आता माजी आ.स्नेहलता कोल्हे व त्यांच्या सुपुत्रांनी विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.त्याआधी भाजपाचे महसूल मंत्री विखे यांचे विरोधात आ.बाळासाहेब थोरात यांना घेऊन गणेश कारखान्याची निवडणूक लढविली.त्यांचेवर भाजप आता कोणती कारवाई करणार असा कडवा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वहाडणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये विचारला आहे.

“जिल्हा भाजप मधील एक टोळी आपल्याविरुद्ध असली तरी भाजपाचे सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेला आम्ही काय आहोत हे माहित आहे.आप व आ.बच्चू कडू यांची प्रहार संघटना आणि शिवसेना इ.पक्षातून निमंत्रण व संधी असतानाही आम्ही भाजपा व संघ विचारांशीच एकनिष्ठ आहोत व यापुढेही राहणार आहे”- विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

   कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आपण सन 2016 नोव्हेंबर मध्ये प्रस्थापितां विरुध्द लढवली होती.व मतदारांनी दोन्ही प्रस्थापितांना नाकारून आपल्याला निवडून दिले होते.त्यावेळी माजी आ.स्न्हेलता कोल्हे यांनी मोठे आकांडतांडव करून आपल्यावर आकाश कोसळले असा भास निर्माण करून आपण किती भाजपचे निष्ठावान आहोत असा आभास तयार केला होता व आपल्याला हवे तशी दूषणे देऊन वरिष्ठ भाजप नेत्यांना भडकावले होते.(वास्तवात तसे काही झाले नाही तो भाग वेगळा) पुढील काळात आपल्याला काम करण्यात अनंत अडचणी आणल्या होत्या.मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी हाताशी धरून दोन कोटी रुपयांचा निधी अन्यत्र वळवला होता.पाच क्रमांकाच्या तलावाला अडथळे आणण्याची एकही संधी यांनी सोडली नाही.वर्तमानात मात्र माजी आ.कोल्हे यांनी विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.

विजय वहाडणे.

“माजी आ.कोल्हे यांनी विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.त्याआधी भाजपाचेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे विरोधात काँग्रेसचे आ.बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात हात घालुन गणेश कारखान्याची निवडणूक लढविली.
आताही आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे आ.थोरात यांचे उंबरे झिजवणे सुरू आहे”- विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव.

   त्याआधी भाजपाचेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे विरोधात गणेश कारखान्याची निवडणूक काँग्रेसचे आ.बाळासाहेब थोरात यांचेशी चुंबाचुंबी करून लढविली.
आताही आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे आ.थोरात यांचे उंबरे झिजवविण्याचे काम कोल्हेच करताहेत.दक्षिणेत लोकसभा  निवडणुकीत भाजप विरुद्ध खा.नीलेश लंके यांना उघडपणे मदत केली.त्यांच्या अशा पक्षद्रोही हालचाली सुरु असतांना जिल्हा भाजपा नेत्यांनी डोळ्यावर कातडे का ओढले आहे.आपल्या विरुद्ध कारवाई केली त्यावेळी गप्प असलेले भाजपाचे नेते आ.प्रा.राम शिंदे,चंद्रशेखर कदम आता कोल्हे यांच्यावरही कारवाई करा असे  म्हणू शकत नाहीत,कारण त्यासाठी हिंमत व नैतिकता लागते.ती त्यांनी केंव्हाच गमावली आहे.भाजपाच्या जीवावर मिळालेली आमदारकी भोगून,स्वतःच्या संस्थाचे फायदे करून घेऊन भाजपालाच टांग मारण्याच्या विचारात असलेल्याना पक्षानेच आता त्वरित हाकलले पाहिजे.स्वपक्षाने अन्याय केला म्हणून आपण नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून नगराध्यक्ष झालो तरी आजही आपण व माझे सहकारी कार्यकर्ते भाजपाशीच निष्ठा ठेवून आहोत.लोकसभा निवडणूक प्रचारातही आम्ही सक्रिय होतो.त्याउलट कोल्हे यांनी प्रचारात सक्रिय व्हावे यासाठी भाजपच्या अनेक नेते व मंत्र्यांना कोल्हे यांच्या वस्तीवर हेलपाटे मारावे लागले होते.उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदींनी पायधूळ झाडून ही  फारसा उपयोग झाला नाही.कोल्हे यांनी भाजपाची संघटना तर फोडलीच पण संघातही चमचे पेरून ठेवले हे तर सर्वात मोठे पाप त्यांनी केले असल्याचा आरोप वहाडणे यांनी केला आहे.कोल्हे यांचा इतर कुठल्याही मतदारसंघात प्रभाव नसल्याने भाजपाला त्यांचा काहीच उपयोग नाही हे सांगण्यास ते विसरले नाही.

   मात्र हे करताना त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांची भलामन करताना त्यांचा अनेक मतदारसंघात प्रभाव असल्यामुळे अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपाला नक्कीच उपयोग होतो व यापुढेही होणार आहे.त्यांच्या शिर्डी मतदारसंघातही कोल्हे चबढब करताहेत तेही काँग्रेसशी हातमिळवणी करून.लोकसभा निवडणुकीतही कोल्हे खा.निलेश लंके यांच्याशी संपर्क ठेवून होते असा थेट आरोप केला आहे.भाजपात राहून इतर पक्षांशी घरोबा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोल्हे यांनी भाजपाला सोडचिट्टी देण्याच्या आधीच भाजपाने त्यांना अधिकृतपणे पक्षातून हाकलले पाहिजे.

   दरम्यान त्यांनी जिल्हा भाजप मधील एक टोळी आपल्याविरुद्ध असली तरी भाजपाचे सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेला आम्ही काय आहोत हे चांगले माहित आहे.आप व आ.बच्चू कडू यांची प्रहार संघटना आणि शिवसेना इ.पक्षातून निमंत्रण व संधी असतानाही आम्ही भाजपा व संघ विचारांशीच एकनिष्ठ आहोत व यापुढेही राहणार आहोत.कोल्हे यांचेवाचून भाजपाचे काहीही अडलेले नाही त्यामुळे कोल्हे आणि कंपनीची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close