जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

समन्यायीचे भूत बसणार नगरच्या मानगुटीवर-…यांचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)    

राज्य सरकारने आगामी दुष्काळी पार्श्वभूमीवर समन्यायी कायद्याचा बागुलबुवा करत जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते जलसमाधी घेतील असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.त्यामुळे गामी काळात समन्यायी कायद्यावर चर्वितचर्वण होणार हे ओघाने आलेच.

जायकवाडी धरण संकल्पित छायाचित्र.

सध्या मोसमी पावसासाठी पूरक वातावरण होत नसल्याने राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीत कायम आहे. तर अगदी तुरळक भागात स्थानिक वातावरण निर्माण मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे.सध्या राज्यातील बळीराजा चातकाप्रमाणे पावसाकडे डोळे लावून बसला आहे.मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके हातातून गेली आहे.त्यामुळे दुष्काळ या वर्षी पाचवीला पुजलेला असल्याचे  दिसू लागले आहे.त्यात नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे बऱ्याच अंशी भरली असल्याचे दिसत असले तरी ती पुरेशी नाही त्याची सरकारला जाणीव झाल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन धरणावर पिण्याचे आरक्षण टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना हुकूम दिले आहेत.त्यांनी त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.त्यामुळे या वर्षी दुष्काळ निश्चित झाल्यात जमा (केवळ औपचारिकता बाकी आहे) आहे.परिणामस्वरूप आता,’समन्यायी कायदा सन-२००५’ या कायद्याचे भूत मानगुटीवर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे.त्यामुळे आताच राजकीय जलतज्ज्ञ,पुढारी आणि कार्यकर्ते,शेतकरी चिंता ग्रस्त झाले आहे अशातच काँग्रेसच्या नेत्यांनी या कडे लक्ष वेधून घेतले आहे.या प्रश्नी कॉंग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन याकडे सर्व प्रथम लक्षवेध केला आहे.

त्यांनी या प्रकरणी निवेदनात म्हटले आहे की,”या प्रश्नी नुकतीच छ.संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे यासाठी जायकवाडी कालवा समितीची बैठक झाली आहे.जायकवाडी धरणामध्ये सध्या ३३ टक्के म्हणजेच ७२८ द.ल.घ.म.जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे.यामध्ये संपूर्ण वजावट होऊन २०२ म.म.क्यु.पाणी खरीप हंगामातील शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल.०१ सप्टेंबर पासून शेती सिंचनाचे आवर्तन चालू करावे अशी मागणी सदर बैठकी मध्ये करण्यात आली आहे.हे आवर्तन सोडल्यास २१ दिवस पाणी सतत चालू राहील व १८० एम.एम.क्यू.पाणी वापरले जाईल.

सध्याच्या एम.एम.क्यू.आर.ए.च्या कायद्याच्या ११अनव्ये १५ ऑक्टोबर जी स्थिती असते,त्या स्थितीनुसार वरच्या धरणातील पाणी सोडण्याची तरतूद आहे.अ.नगर व नाशिक जिल्ह्यातील आजची धरणातील पाणी स्थिती निळवंडे,भंडारदरा,नांदूर मधमेश्वर १०० टक्के,पुणेगांव,दारणा,मुकणे,वाकी,भाम,भावली,वालदेवी साधारण ६० ते ७० टक्के आहे.ही परिस्थिती मुंबईकडून येणाऱ्या मान्सून वाऱ्यामुळे आहे.हा पाऊस आपल्याला साधारण सप्टेंबर महिन्यात शेवटपर्यंत असतो.

सध्या अनेक वर्षापासून एम.एम.क्यू.आर.ए.या समन्यायी पाणी वाटप मंडळाचे अध्यक्ष पद हे रिक्त असल्यामुळे कुठे ही पाण्यात सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ नये.कारण परतीचे जे पाऊस सुरू होणे बाकी आहे व ते पूर्वेकडून येणारे असतात,त्या पावसाने काही दिवसातच जायकवाडी भरेल.परंतु जर अ.नगर नाशिक जिल्ह्यातील या स्थितीत जर धरणांचे पाणी सोडले तर धरणं रिकामी होऊन जातील व फक्त जायकवाडी धरणातच पाणी शिल्लक राहिल व भौगोलिक परिस्थितीमुळे जायकवाडीचे पाणी नाशिक नगर व वैजापूर वरील भागात देणे अशक्यच बनणार आहे.म्हणून सध्या एम.एम.क्यू.आर.ए.चे रिक्त अध्यक्ष पद असे पर्यंत कुठलाही घातक निर्णय घेऊन वरील भागावर अन्याय करू नये.

राज्य सरकारने पाणी सोडण्याचा घातक निर्णय घेतल्यास सदर सोडलेल्या पाण्यामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात असंख्य शेतकऱ्यांसह काँग्रेसजन ‘जल समाधी’घेतील असा इशारा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य आदींना देण्यात आला आहे.सदर निवेदन ई-मेल द्वारे व प्रत्यक्ष तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले आहे.

सदर प्रसंगी त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीन शिंदे,काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे,सुनील साळुंखे,जाधव,छबुराव शिंगाडे,चंद्रकांत बागुल,स्वरूप अशोक खांबेकर,अँड.शितल देशमुख,शब्बीर,यादव त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close