जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेसाठी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील महाविद्यालयात पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये ५७ किलो वजन गटात अविनाश दत्तू कोळपे या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ६१ किलो वजन गटात प्रसाद नाना कोळपे या विद्यार्थ्याची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.   

शेवगाव येथील महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये ५७ किलो वजन गटात अविनाश दत्तू कोळपे या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ६१ किलो वजन गटात प्रसाद नाना कोळपे या विद्यार्थ्याची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.   

हे दोन्ही खेळाडू दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये अ.नगर जिल्हा विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते.

आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,प्राध्यापक आदींनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close