कोपरगाव शहर वृत्त
‘शासकीय योजना आपल्या दारी’,कोपरगावात उपक्रम !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासनाच्या नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा गरजू नागरिकांना लाभ मिळावा यासाठी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची उपलब्धता एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी कोपरगाव शहरात ‘शासकीय योजना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचा कोपरगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशातून हा उपक्रम हाती घेतला आहे.यामध्ये विधवा महिला,अपंग नागरिक व वृद्ध नागरिक आदींना इंदीरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेंशन योजना,इंदीरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व,अपंग पेंशन योजना,संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक दाखले लाभार्थ्यांना मिळणार आहे.
कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी शनिवार (दि.०४) रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत सुभाषनगर येथील श्री लक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी ‘शासकीय योजना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.विधवा महिला,अपंग व वृद्ध गरजू लाभार्थ्यांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशातून हा उपक्रम हाती घेतला आहे.यामध्ये विधवा महिला,अपंग नागरिक व वृद्ध नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या इंदीरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेंशन योजना,इंदीरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व,अपंग पेंशन योजना,संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक दाखले लाभार्थ्यांना मिळणार आहे.
त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र घेवून पात्र असणाऱ्या कोपरगाव शहरातील विधवा महिला,अपंग व वृद्ध गरजू लाभार्थ्यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा.पुढील काही दिवसात ग्रामीण भागात देखील हा उपक्रम राबविला जाणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील कागदपत्रांची जमवा जमव करून ठेवावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.