जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

आरोग्य विभागात अपहार,कोपरगाव पालिकेचा कर्मचारी फरार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागातील ठेकेदारीवर काम करणारा संगणक कर्मचारी गत पंधरा दिवसापासून फरार झाला असून त्याने दहा-बारा लाखांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे काल रात्री वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने त्याच्या घरी जाऊन धिंगाणा घातल्याचे वृत्त कोपरगाव शहरात वाऱ्यासारखे पसरले आहे.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान सदर कर्मचारी हा ‘सेक्सन पंपा’चे (शहरातील नागरिकांचे तुंबलेल्या सौचालय टाक्या उपसण्याबाबत एक पंप त्याचे ) आर्थिक देणे-घेणे आदी काम करत होता.त्यातून आलेल्या रकमेच्या पावत्या देण्याचे काम त्याच्यावर सोपवले होते.त्यातून हा प्रकार उघड झाला असून त्यातून १०-१२ लाख रुपयांची आलेली रक्कम परस्पर लांबवली असल्याचे बोलले जात आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेत डिसेंबर २०२१ पासून ‘प्रशासक राज’ सुरु आले आहे.तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा कालावधी डिसेंबर २०२१ मध्ये संपला आहे.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेत पदाधिकारी व नगरसेवक यांना ‘न भूतो’ असा ‘साग्रसंगीत’ वाटे लावण्यात आले होते.त्यानंतर पालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘प्रभारी राज’ आले आहे.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे नगराध्यक्ष यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेला आहे.त्यामुळे शहरातील विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक राहिला नाही.प्रशासनात बेदिली माजली आहे.कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही.त्यातून अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहे.अशीच आरोग्य विभागातील घटना नुकतीच उघड झाली आहे.

राज्यातील नगरविकास विभागात अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहे.त्यामुळे ‘ती’ गरज पूर्ण करण्यासाठी खाजगी ठेकेदारीवर कर्मचारी नेमणूक केलेली आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.कोपरगाव आरोग्य विभागात काही कर्मचारी हे ठेकेदारीवर भरलेले आहे.त्यातील एक वादग्रस्त कर्मचारी हा कर्मवीरनगर या उपनगरातील रहिवासी आहे.तो कर्मचारी गत पंधरा दिवसापासून कामावर आलेला नाही.तो फरार झाला आहे.त्यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी हैराण झाले असून तो का फरार झाला आहे.याचा शोध घेतला असता त्याने आपल्या कडे आलेली ‘सक्सेन पंपा’ची रक्कमच नगरपरिषदेच्या खात्यात भरलेली नाही असे निदर्शनास आले आहे.हि रक्कम ९८ पावत्यांची असून किमान १०-१२ लाख असल्याचे बोलले जात आहे.त्याच्या या बेताल वागण्याने वरिष्ठ अधिकारी संतापले असून काल रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचे घर गाठले होते.व त्या ठिकाणी त्यांच्यात गल्लीत उभे राहुन मोठा तमाशा झाल्याने हा विषय गल्लीत आणि गल्लीतून गावभर पसरला आहे.

दरम्यान या कोलाहलात त्या कर्मचाऱ्याच्या घरचे लोक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्यात वादावादी झाली असल्याचे समजत आहे.या संबंधी आमच्या प्रतिनिधीने संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचा घटनेला दुजोरा दिला आहे.मात्र सदर रक्कम एकढी मोठी नाही.ती २४-२५ हजार असल्याचे सांगून पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र संबधीत इसम,”कामावर येत नाही व भ्रमणध्वनी उचलत नाही” असे सांगून आपण त्याच्या घरी गेलेलो होतो या घटनेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान संबंधित इसम कापड बाजारातील पती-पत्नीने पद भुषविलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याकडे जाऊन अभयदान मागितले असल्याचे वृत्त हाती आले आहे.त्यामुळे हा गैरव्यवहार झाला आहे.यात दुमत राहिलेले नाही.याअगोदर एका कर्मचाऱ्याने अशाच गैरव्यवहारातून आत्महत्या केल्याची घटना फार जुनी झालेली नाही.त्या नंतर एक कर्मचारी फरार झाला होता.’तो’ तब्बल दीड वर्ष फरार झाला होता.त्यास पालिकेने कामावर रुजु करून घेतले आहे.ते कसे कसे ? घेतले याचा उलगडा अद्याप झालेला नाही.त्यानंतर हा तिसरा प्रकार समोर आला आहे.आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close