जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव साठवण तलावाची…या अधिकाऱ्यांकडून पाहणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावच्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी अहंम असून त्यासाठी पाच क्रमांकाचा तलाव महत्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याने त्याकडे आ.आशुतोष काळे यांचे लक्ष असून ते काम वेगाने सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली असून या कामाची नुकतीच बांधकाम व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या कामाबरोबरच ९१ किलोमीटरची नवीन पाईपलाईन,पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर,ब्रिजलाल नगर,गोरोबा नगर व मोहनीराज नगर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती,बेट मोहनीराज नगर भागातील पाईपलाईन आदी कामांचा अधिकारी एम.यू.खोब्रागडे यांनी पाहणी केली आहे.

आ.काळे यांनी साठवण तलाव क्रमांक ५ व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मंजूर केला आहे.हा साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे.या कामाचे बांधकाम विभाग प्रमुख व पर्यावरण शाखा प्रमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथील अधिकारी एम.यू.खोब्रागडे यांनी रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी ५ नंबर साठवण तलावाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे.

सदर प्रसंगी नगरपालिका अभियंता सुनील काजवे,प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांचे प्रतिनिधी व लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते.५ नंबर साठवण तलावाच्या कामाबरोबरच ९१ किलोमीटरची नवीन पाईपलाईन,पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर,ब्रिजलाल नगर,गोरोबा नगर व मोहनीराज नगर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती,बेट मोहनीराज नगर भागातील पाईपलाईन आदी कामांचा अधिकारी एम.यू.खोब्रागडे यांनी पाहणी केली आहे.सुरू असलेल्या कामाची नगरपालिका अभियंता सुनील ताजवे,प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांचे प्रतिनिधी व लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे.

कोपरगाव नगरपरिषद ५ नंबर साठवण तलाव,वितरण व्यवस्था,जलकुंभ यांचे काम योग्य पद्धतीने करून घेत असल्याचे पाहणी अहवालात नमूद केले असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close