जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

नागरिकांना ४ दिवसाआड पाणी द्या-पालिका प्रशासनास सूचना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्यातून सोडण्याण्यात आलेल्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून पूर्ण क्षमतेने भरून घेऊन शहरातील नागरिकांना ४ दिवसाआड पाणी द्यावे अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

“वर्तमानात सुरु असलेल्या आवर्तनातून कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून घ्यावेत.जोपर्यंत सर्व पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलाव भरले जात नाही तोपर्यंत आवर्तन सुरूच राहणार आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साई संस्थान शिर्डी.

कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगाव शहरातील नागरिकांना यापूर्वी आठ दिवसांनी पाणी पुरवठा केला जात होता.मात्र जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस तसेच धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.सद्यस्थितीत पाऊस देखील सुरूच असून धरणात नवीन पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.त्यामुळे गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पूर पाणी सोडण्यात येत होते. मात्र कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले नव्हते.गोदावरी कालव्यांवर अनेक पाणी पुरवठा योजना अवलंबून असून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांच्या गावतळ्यात पाणी भरून घेणे आवश्यक होते.

त्यामुळे गोदावरी कालव्यांना पिण्यासाठी पाणी सोडावे याबाबत पाटबंधारे विभागाशी चर्चा केली होती.त्याचा विचार करून पाटबंधारे विभागाने सोमवार (दि.१८) पासून गोदावरी कालव्यांना पाणी सोडले असल्याचा दावा केला आहे.या सुरु असलेल्या आवर्तनातून कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून घ्यावेत.जोपर्यंत सर्व पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलाव भरले जात नाही तोपर्यंत आवर्तन सुरूच राहणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close