जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरातील प्रलंबित प्रश्न निकाली काढा-…या पक्षाची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात अनेक विकास कामे प्रलंबित असून त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने प्रलंबित असणारी विकास कामे मार्गी लावून नागरिकांना येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात अशा आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले आहे.

“गत अनेक महिन्यांपासून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण झालेलं नाही.त्याची दखल घेवून लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण करावे.शहरातील प्रमुख रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे प्रलंबित काम पूर्ण करावे,विविध प्रभागांतील चिखलमय झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा,सततच्या पावसाने रोगराई पसरण्याची शक्यता आहे”-सुनील गंगुले,अध्यक्ष,शहर राष्ट्रवादी काँग्रेस.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की,”मागील अनेक महिन्यांपासून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण झालेलं नाही.त्याची दखल घेवून लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण करण्याचे नियोजन करावे.शहरातील प्रमुख रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे प्रलंबित काम पूर्ण करावे,विविध प्रभागांतील चिखलमय झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा,मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.रोगराई थांबविण्यासाठी शहरात कीटकनाशक धूर फवारणी करावी.डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत असून या डबक्यांमधले पाणी काढण्यात यावे व सर्वच गटारी वाहत्या कराव्या आदी मागण्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,फकीर कुरेशी,रमेश गवळी,दिनकर खरे,मायादेवी खरे,अजीज शेख,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रावसाहेब साठे,प्रकाश दुशिंग,राजेंद्र खैरनार,आकाश डागा,अंबादास वडांगळे,बाळासाहेब पवार,एकनाथ गंगूले,किरण अढांगळे,माणिक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close