जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या नेत्याच्या पुतळ्याचे होणार भूमिपूजन!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   स्वातंत्र्य सेनानी कोपरगांव नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.माधवराव कचेश्वर आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्त माधव बाग येथे त्यांच्या पुतळ्याचे भुमीपूजन व लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ०४ वाजता
राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती विजयराव आढाव यांनी दिली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पाटबंधारे राज्यमंत्री आण्णासाहेब म्हस्के हे राहणार आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.माधवराव आढाव.

स्व.माधवराव आढाव यांनी आपल्या कार्यकाळात शहरास स्थायी पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव क्रमांक ०१ ते ०४ उभारण्यास गती दिली होती.शिवाय ज्या उपनगरात अर्धाकृती पुतळे आहेत त्यात त्यांचे योगदान होते.त्यात सुभाषनगर,टिळकनगर आदींचा समावेश आहे.शहराच्या सुशोभीकरणास गती देताना त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते माधवबागेचे सन – १९६६ साली उद्घाटन केले होते.या शिवाय जिजामाता उद्यान,शिवाजी उद्यान,खुले नाट्यगृह,फुले भाजी मार्केट यासह अनेक संकल्पना त्यांनी सत्यात उतरवल्या होत्या.त्या आजही त्यांच्या कामाची साक्ष देत उभ्या आहेत.

   कोपरगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माधवराव आढाव हे सर्वात लोकप्रिय सर्वाधिक चार वेळा नगराध्यक्ष व ४४ वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर एकदा ते लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.जनतेच्या मनात स्थान राखून आहेत.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोकपयोगी कामे केली होती.त्यात त्यांनी गोदावरी नदीस पूर आल्यामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी आपल्या स्वकष्टार्जित जमीन देऊन लक्ष्मीनगर वसवले होते.त्यांच्या पत्नीचे नाव धारणगाव रोडलगत असलेल्या उपनगरास दिले आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात शहरस स्थायी पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी तलाव क्रमांक ०१ ते ०४ उभारण्यास गती दिली होती.शिवाय ज्या उपनगरात अर्धाकृती पुतळे आहेत त्यात त्यांचे योगदान होते.त्यात सुभाषनगर,टिळकनगर आदींचा समावेश आहे.शहराच्या सुशोभीकरणास गती देताना त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते माधवबागेचे सन – १९६६ साली उद्घाटन केले होते.या शिवाय जिजामाता उद्यान,शिवाजी उद्यान या त्यांच्याच संकल्पना त्यांनी सत्यात उतरवल्या होत्या.आज वाचनालयाच्या जागी जुनी नगरपालिका इमारत,आज तालुका पोलीस ठाण्याच्या समोर असलेला दवाखाना इमारत,(आज नगरपरिषद कार्यालय असलेली इमारत)
त्यांचीच देणगी होती.तहसील कार्यालयासमोर असलेली मात्र आज पडलेली नगरपरिषद इमारत त्यांनी उभारली होती.या शिवाय नगरपरिषद कर्मचाऱ्यांना त्यांनीच निवासस्थाने उभारू दिले होते.महात्मा फुले भाजी मार्केट,आजचे जीर्ण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह त्यांच्याच कार्याची फलनिष्पत्ती होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला अर्धाकृती पुतळा १९६४ साली उभारला होता या शिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतिगृह म्हणून उपयोग होणाऱ्या शेतकरी बोर्डिंग,माळी बोर्डिंग त्यांच्या कार्यकाळात उभारल्या गेल्या होत्या.या शिवाय नाभिक समाजास त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा निर्माण करून दिली होती.त्यामुळे त्यांच्या पुतळ्याचा स्तुत्य उपक्रम होत आहे ही आनंदाची बाब मानली जात आहे.

  दरम्यान या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी आ.अशोक काळे,संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,वैजापूरचे आ.रमेश बोरनारे ,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदी उपस्थित राहणार आहे.तरी या कार्यक्रमास कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश आढाव यांचेसह
लक्ष्मी-माधव प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.या उपक्रमास ‘ न्युजसेवा’ वेब पोर्टलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close