जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

सहकार न्यायालय इमारतीस निधी द्या -…या वकिलांची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )
  

   कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात इमारत आहे.कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे.मात्र येथील सहकार न्यायालय अद्यापही गोदा-प्रवरा सहकारी संस्थेच्या भाडोत्री इमारतीत कसेबसे सुरू आहे.त्यामुळे आता सहकारी न्यायालयास स्वतंत्र इमारत बांधणीसाठी मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अभोयोक्ता व कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अशोक वहाडणे यांनी आज आ.आशुतोष काळे यांचेकडे नुकतीच केली आहे.

  

“सहकार न्यायालयास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दक्षिण बाजूस राज्य सरकारने एकूण १० आर.क्षेत्र मंजूर केले आहे.त्याची मोजणी भूमिअभिलेख कार्यालयाकडून झाली आहे.ती मोजणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून ताबा मिळाला असून त्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयासारखी सुसज्ज इमारत होणे गरजेचे आहे”-ऍड.अशोक वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.

  कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयास सन-२०२१ साली वकील संघाने केलेल्या मागणीनुसार आ.आशुतोष काळे यांचे सहकार्याने राज्य सरकारकडून ३८ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.त्याचे भूमिपूजन गत वर्षी जानेवारी २०२४ मध्ये वाजतगाजत संपन्न झाले होते.त्या चार मजली असलेल्या व १६० फूट लांब व रुंद असलेल्या इमारतीचे काम जवळपास ६० टक्के पूर्णत्वाकडे गेले आहे.सदर बांधकाम आणखी एक वर्षात पूर्ण होईल असे समजले जात आहे.त्याचा काम करण्याचा कालावधी अद्याप एक वर्षे बाकी आहे.सदर काम हे के.एच.कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतलेले आहे.त्याची पाहणी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आ.काळे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केली आहे.त्यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अशोक वहाडणे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत ही मागणी केली आहे.

   सदर प्रसंगी अॅड.भास्कर गंगावणे,अॅड.मनोहर येवले,अॅड. सुयोग जगताप,अॅड.मनोज कडू,अॅड.एस.एस. वाघ,अॅड. अशोक टुपके,अॅड.ए.जी.देशमुख,वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.डी.जी.देवकर,अॅड.शंतनू धोर्डे,अॅड.शिरीष लोहकणे,अॅड.सुरेश मोकळ,अॅड.योगेश खालकर,अॅड.जी.बी.भोकरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे,प्रसाद वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक डॉ.अजेय गर्जे,कृष्णा आढाव,मनोज नरोडे व अन्य कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

  

सदर न्यायालयीन इमारतीचे काम हे के.एच.कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतलेले आहे.त्याची पाहणी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आ.काळे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केली आहे.त्यावेळी कामाची माहिती देताना उपअभियंता वर्षेराज शिंदे दिसत आहे.

  त्यावेळी त्यांनी सहकार न्यायालय इमारतीची कैफियत मांडताना या न्यायालयास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दक्षिण बाजूस राज्य सरकारने एकूण १० आर.क्षेत्र मंजूर केले आहे.त्याची मोजणी भूमिअभिलेख कार्यालयाकडून झाली आहे.ती मोजणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून ताबा मिळाला असल्याचे सांगून त्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयासारखी सुसज्ज इमारत होणे गरजेचे आहे.मात्र त्यास अद्याप निधी मिळालेला नाही या बाबीकडे ऍड.वहाडणे यांनी लक्ष वेधून घेतले आहे.त्यावेळी त्यांनी सदर इमारतीसाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती ऍड.अशोक वहाडणे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close