जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

खुल्या नाट्यगृहाचे भाग्य उजळणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले होते.मात्र नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन आज विद्यमान लोकप्रतिनिधी यांना जग आली असून त्यांनी आज त्याबाबत तोंड उघडले असून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  

   मध्यंतरी विजय वहाडणे हे अध्यक्ष असताना त्यांनी आ.काळे यांचे सहकार्याने एक कोटी रुपयांचा निधी दुरुस्ती साठी मंजूर केला होता.मात्र त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी नागरिकांनी सदर नाट्यगृह पूर्णच नवे व्हावे अशी मागणी लावून धरली होती.त्यामुळे त्याची डागडुजी होऊ शकली नाही त्यामुळे त्याला मोठी अवकळा आली आहे.

  निळवंडे धरणाच्या कालव्यांसारखे कोपरगाव खुले नाट्यग्रहाला काही मुहूर्त लाभत नाही.नगरपरिषद निवडणूक आली  किंवा विधानसभा निवडणूक आली की यावर वर्तमान नेते आवाज  उठवतात.मात्र निवडणुकीत मते बंदिस्त झाले की सर्व विषयही मतपेटित बंदिस्त होतात असा सार्वजनिक अनुभव आहे.कोपरगाव खुले नाट्यगृह याला अपवाद नाही.मागील आ.स्नेहलता कोल्हे यांच्या काळात याला जलसंपदा विभागाने दोन एकर जमीन दिली अशी मोठी आवई उठवली गेली होती.त्याला आता जवळपास आठ वर्षाचा कालावधी उलटला आहे.मात्र अद्याप नाट्य प्रेमींना त्यांना काही आनंद घेता आला नाही.नाट्य प्रेमी सुशांत घोडके यांनी त्यांच्या प्रयत्नातून सन-२००८ साली जिल्हा स्तरीय नाट्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्यानंतर या नाट्य गृहास जे गळती लागली ती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे.मध्यंतरी विजय वहाडणे हे अध्यक्ष असताना त्यांनी आ.काळे यांचे सहकार्याने एक कोटी रुपयांचा निधी दुरुस्ती साठी मंजूर केला होता.मात्र त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी नागरिकांनी सदर नाट्यगृह पूर्णच नवे व्हावे अशी मागणी लावून धरली होती.त्यामुळे त्याची डागडुजी होऊ शकली नाही त्यामुळे त्याला मोठी अवकळा आली आहे.आता तर नगरपरिषदेच्या चार चाकी आणि तीन चाकी वाहने लावण्याचे ठिकाण म्हणून त्या नाट्यगृहाची नवी ओळख निर्माण झाली आहे.त्यातच नाट्य दिनाचे दिवशी काही उत्साही कार्यकर्त्यांनी सदर नाट्यगृहात हार अर्पण केऊन निषेध व्यक्त केला होता.त्यानंतर आता आ.आशुतोष काळे यांना जाग आली असल्याचे मानले जात आहे.त्यांनी आता बैठक घेऊन दोन कोटी दिला असल्याची घोषणा केली आहे.तर निधी कमी पडला तर अजून देऊ अशी घोषणा केली खरी पण ती पूर्ण झाल्यावरच नाट्य प्रेमींनी आनंद उत्सव केला तर उत्तम अशीच सामान्य नागरिकांची इच्छा असल्याचे दिसत आहे.

    आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी यावेळी तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप,सार्वजनिक बांधकाम अभियंता वर्षराज शिंदे,तालुका क्रीडा अधिकारी कोंढवणे,नगर रचनाकार अश्विनी पिंगळ,पद्माकांत कुदळे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,अरुण चंद्रे,प्रशांत वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी आ.काळे यांनी म्हणाले की,”कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहरातील नाट्य रसिकांना खुले नाट्यगृह व युवा खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारायचे आहे.त्यासाठी हे काम लवकरात कसे पूर्ण होईल यासाठी सबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा वेग वाढवावा व कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाची निर्मिती करावी.त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील.खुले नाट्यगृहासाठी दोन कोटी निधी दिला असून अजूनही निधीची गरज भासल्यास निधी मिळवून देईल अशी ग्वाही दिली व लवकरात लवकर नाट्यगृह उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

   कोपरगावमध्ये अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत. खुल्या नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य प्रदर्शन, संगीत संमेलने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी व प्रत्येक कलाकाराच्या कलेला वाव मिळवणारे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे.नागरिकांना कला आणि संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.त्यामुळे सांस्कृतिक उन्नतीला चालना मिळून स्थानिक कलाकारांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आपले कौशल्य प्रकट करण्यासाठी एक मंच मिळणार आहे.आपल्या कलेच्या माध्यमातून प्रतिभावंत कलाकार निश्चितपणे कोपरगावचे नाव उज्वल करतील असा आशावाद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close