जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग जगत

हॉटेल व्यवसायात योग्य प्राथमिक सुविधा गरजेच्या-अड्.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपला हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे व यशस्वी करण्यासाठी हॉटेल व्यवसायात योग्य प्राथमिक सुविधा आणि वाहतूक सुविधा असणे ही एक महत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रदेश राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भारतामध्ये हॉटेल व्यवसाय हा एक चांगला व आकर्षक व्यवसाय मानला जात आहे.आणि तो व्यवसायासाठी एक चांगला पर्याय आहे,कारण भारतामध्ये मुख्य आकर्षण विविध प्रकारच्या संस्कृती यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे”-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना.

श्रीरामपूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक विजय दशरथ माने यांच्या मालकीच्या ‘हॉटेल वैशाली’ याचे उदघाटन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नुकतेच मोठ्या उत्साहात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक सुखमित सिंह बात्रा,श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश मुदगुल,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,हॉटेल तोरणा सोनईचे संचालक प्रकाश शेटे,अनिल शेटे,चंद्रकांत ढवळे,राजेंद्र पठाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारतामध्ये हॉटेल व्यवसाय हा एक चांगला व आकर्षक व्यवसाय मानला जात आहे.आणि तो व्यवसायासाठी एक चांगला पर्याय आहे,कारण भारतामध्ये मुख्य आकर्षण विविध प्रकारच्या संस्कृती यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि पुढेही अशीच वाढत जाईल.म्हणूनच भारतामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करणे एक फायद्याच्या व्यवसाय असू शकतो असा विचार करून श्रीरामपूर येथील व्यावसायिक विजय दशरथ माने यांनी नुकताच सुरु केला आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल औताडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश शेटे यांनी केले तर उपस्तितांचे आभार राजेंद्र पठाडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close