जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग जगत

राज्यातील…या शहरात एक हजार एकरात वस्त्रनगरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

औरंगाबादः
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील तरुणांसाठी लवकरच नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने औरंगाबाद इथल्या औद्योगिकनगरीत तब्बल एक हजार एकर जागेत वस्त्रनगरी उभारण्याचा इरादा केला आहे.एक हजार एकरावर भव्य टेक्सटाइल पार्क उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने नुकताच केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला.प्रस्तावित पार्कमुळे एक लाख थेट रोजगार उपलब्ध होतील आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळेल.

केंद्र सरकारने देशभरातल्या सात टेक्सटाईल पार्कसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. २०२७-२८ पर्यंतच्या सात वर्षांच्या कालावधीत ४४४५ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे १३ राज्यांमधून टेक्सटाईल पार्क उभारणीसाठी १८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

‘पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ऍपरल’ योजनेंतर्गत केंद्र सरकार देशभरात सात भव्य वस्त्रनगरी उभारणार आहेत.‘ग्रीनफिल्ड’ आणि ‘ब्राऊन फील्ड’ साइटमध्ये पीएम मित्रा योजनेंतर्गत देशभरात सात जागतिक दर्जाचे,सर्व सोयीसुविधांयुक्त मेगा टेक्सटाईल पार्क स्थापित केले जातील.कापड व्यवसायासाठी वस्त्रोद्योगांतर्गत वीज,पाणी,इंटरनेटसह सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मेगा टेक्सटाइल पार्कसाठी लागणारी एक हजार एकरपेक्षा जास्त जमीन औरंगाबाद इथल्या औद्योगिक नगरीत जागतिक दर्जाच्या सुविधांच्या धर्तीवर उपलब्ध आहे.या जमिनीवर केंद्र शासनाकडून मंजुरी मिळताच टेक्सटाईल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने देशभरातल्या सात टेक्सटाईल पार्कसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. २०२७-२८ पर्यंतच्या सात वर्षांच्या कालावधीत ४४४५ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे १३ राज्यांमधून टेक्सटाईल पार्क उभारणीसाठी १८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.विदर्भात अमरावती इथेही टेक्सटाईल पार्क उभारणीचा प्रस्ताव असून औरंगाबाद इथल्या ऑरिक सिटीत मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे.वस्त्रोद्योगाला आकार आणि स्केल प्राप्त करण्यास सक्षम करणं हे टेक्सटाईल पार्कचं उद्दिष्ट आहे.एकाच ठिकाणी आधुनिक आणि एकात्मिक वस्त्रोद्योग मूल्य साखळी तयार करुन टेक्सटाइल पार्कला मान्यता मिळावी यासाठी राज्य सरकारकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘पीएम मित्रा पार्क’ प्लग आणि प्ले सुविधांसह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करतील आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात बड्या कंपन्यांचा समावेश करतील.सोबतच नवीन उद्योजकांनाही या पार्कमध्ये संधी देण्यात येणार आहे.परिणामी,मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्यास आणि रोजगाराला चालना मिळण्यास मदत होईल.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close