जाहिरात-9423439946
आंदोलन

“…अन्यथा आम्ही मोकाट कुत्रे पालिकेत आणून सोडू”-कोपरगावात इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगर परिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यात काल सकाळी ०९ वाजेच्या सुमारास संजयनगर येथील हसनेन तांबोळी,हमजा अत्तार,रा.आयेशा कॉलनी तर फैजल शेख आदींवर त्यांच्या राहात्या घराजवळ मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असून त्यात हे तिघे गंभीर जखमी झाले झाल्याचे पडसाद शहरात उमटले असून या प्रकरणी,”या मोकाट प्राण्यावर पालिकेने कारवाई करावी व त्यांचा वैद्यकीय खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा अन्यथा आम्ही मोकाट कुत्रे पालिकेत आणून सोडू” असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

“दरम्यान शहरात प्रातःकाळी जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर फिरण्यास जातात त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.गावात आपल्या वाहनांवर फिरणारे नागरिक सुरक्षित राहिले नाही त्यातून अपघात वाढले आहे.त्यामुळे या मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा,अधिकाऱ्यांनी केवळ कामाची गुणवत्ता न तपासता बिले काढण्याकडे लक्ष देऊन नये”-संतोष गंगवाल,उपाध्यक्ष,अ.नगर जिल्हा,म.न.से.

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या संजयनगर परिसरात मोकाट कुत्री आणि जनावरांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला आहे.सदर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी मोकाट कुत्री बसत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतो.अनेक अपघात घडून त्यात अनेकांना आपले अवयव गमवावे लागत असून काहींना आपले प्राण गमवावे लागत आहे.काही घटनात आतापर्यंत काही जणांना या कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे.कोपरगाव नगरपालिकेचे मोकाट जनावर पकडणारे पथक कुत्र्यांना एका ठिकाणाहून पकडून दुसरीकडे सोडून देते.त्यामुळे एका भागातील मोकाट कुत्र्यांची समस्या सुटते तर दुसऱ्या भागात ती नव्याने निर्माण होते.यावर नगरपालिका प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.मात्र यावर तोडगा निघताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.चार महिन्या पूर्वी अशीच घटना खडकी उपनगरात घडली होती.मात्र त्यावर प्रशासनाने काहीही कारवाई केलेली नाही त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे.पालिकेने यावर योग्य ती कारवाई केली नाही तर मनसे नागरपरिषद कार्यालयात कुत्रे आणून सोडील असा स्पष्ट इशारा पालिकेला दिला असून या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,सुनिल फंड,योगेश गंगवाल आदींनी सह्या केल्या आहे.या घटनेची आता पालिका काय दखल घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close