जाहिरात-9423439946
आंदोलन

…या ठिकाणी शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी,आंदोलन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीला वैधानिक दर्जा व देशातील शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कृषी कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने अड्.अजित काळे व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वात मंगळवारी आज ता.२७ फेब्रुवारी रोजी नेवासे ते श्रीरामपूर ‘ट्रॅक्टर-ट्रॉली रॅली’ आंदोलन करण्यात आले होते.त्याला शेतकऱ्याचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती हाती आली आहे.

  

दरम्यान श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची नेवासा श्रीरामपूर वरून येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी श्रीरामपूरच्या वेशीवर अडवला.यावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली झाली.शेतकरी आंदोलकांनी फक्त २० ट्रॅक्टर शहरात न्यावेत असा आग्रह धरला होता.

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किंमती (एम.एस.पी) च्या कायदेशीर हमीबद्दल शेतकऱ्यांच्या,’दिल्ली चलो’आंदोलनाला देशभरातून पाठींबा लाभत असून कर्जमाफीचा पाठिंबा,एम.एस.पी.कायदा आणण्यात अवास्तव विलंब झाल्यामुळे संतप्त अ.नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे व प्रहार संघटनेच्या नेतृत्वात आज नेवासा ते श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयावर ही,’ट्रॅक्टर रॅली आज दुपारी आयोजित केली होती.

         त्यावेळी पोलिसांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हा मोर्चा अडवण्यात आला.यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,संपर्कप्रमुख शिवाजी जवरे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे,युवराज जगताप यांची पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याबरोबर बाचाबाची झाली  असल्याची माहिती हाती आली आहे.

   यावेळी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन  करण्यात आले होते.या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले होते.हा मोर्चा  नेवासेहून सकाळी निघून श्रीरामपूर येथे दुपारी श्रीरामपुरात दाखल झाला.शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर ही रॅली पुढे मुख्य रस्ता शिवाजी रस्त्याने झाली प्रांत कार्यालयावर दाखल झाली या ठिकाणी दोन्ही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.


   दरम्यान श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची नेवासा श्रीरामपूर वरून येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी श्रीरामपूरच्या वेशीवर अडवला.यावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली झाली.शेतकरी आंदोलकांनी फक्त २० ट्रॅक्टर शहरात न्यावेत अशी विनंती केली.परंतु आंदोलकांनी सर्वच ट्रॅक्टर नेणारच अशी भूमिका घेतली.याप्रसंगी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत प्रांताधिकारी किरण सावंत व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close