जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’आंदोलनाबाबत झाला हा निर्णय,मिळाला दिलासा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील रांजणगाव देशमुख येथील पाझर तलाव निळवंडे धरणाच्या दुसऱ्या चाचणीत भरून द्यावे या प्रमुख मागणीसाठी सुरु करण्यात आलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही जलसंपदा विभाग आणि आंदोलनकर्ते आदींत निर्माण झालेल्या पेचामुळे सुरूच राहिले होते मात्र आज उशिराने मिलेलेल्या माहितीनुसार तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी पाझर तलाव भरण्याची हमी घेतल्याने सदर आंदोलन संपुष्टात आले आहे.त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे.

  

दरम्यान आज माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला असून त्या ठिकाणी त्यांनी राज्याच्या समन्यायी धोरणाचा समाचार घेऊन आपण हा प्रश्न आगामी काळात लावून धरण्याचे जाहीर केले असून त्यासाठी सर्व पक्षीय एकमत करण्याचे सूतोवाच केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी निवडणुका पाहून स्थानिक नेत्याच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२६ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन,विविध संस्थानचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न केले होते.मात्र यातील उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० तर उजवा कालवा २५ टक्के,वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.उजव्या कालव्याचे राहुरी तालुक्यात भूसंपादन अद्याप बाकी आहे.एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून सुद्धा या ५३ वर्ष प्रलंबित प्रकल्पाचे कामाचे लोकार्पण करण्याचा प्रस्थापित नेत्यांनी आगामी लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका पाहून डाव आखला व त्यानुसार त्या कटाची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचे पडसात दुष्काळी भागात तीव्र स्वरूपात उमटले आहे.गत १४ ऑक्टोबर रोजी पाणी सोडून व एक टी.एम.सी.पाणी खर्ची पडले आहे.राहाता व संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यात आले आहे.मात्र सव्वा महिना उलटला तरी कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात एक थेंब पाणी आलेले नाही.त्यासाठी कोपरगाव,श्रीरामपूर,सिन्नर तालुक्यातील राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती कमी पडली असल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात आहे.त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात दुष्काळाचा सामना कसा करायचा,पिण्याच्या पाण्याबरोबर,आपले पशुधन कसे वाचवायचे असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाचे पडसात उमटले असून संगमनेर येथे निळवंडे कालवा कृती समितीने तर करुले संगमनेर येथे पाणी येत नसल्याने दुष्काळी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते.त्यात जलसंपदा विभागाने पाझर तलाव भरण्याचे आश्वासन दिले आहे.कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही पडसाद उमटले असून त्या ठिकाणी सुरु असलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी सुरु होते.त्याची तीव्रता आज वाढविण्यात आलेली होती.

शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्या वेळचे छायाचित्र.

  

आंदोलनकर्ते अड्.योगेश खालकर यांनी आपण आज शनिवारी हा प्रश्न सोडवला नाही तर आपण आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.मात्र ते आपल्या प्रश्नावर अडुन बसले आहे.त्यामुळे महसूल प्रशासनासमोर पेच वाढला होता.मात्र तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी हे पाझर तलाव भरून देण्याची हमी दिल्याने यावरील पेच संपुष्टात आला आहे.

दरम्यान अड्.खालकर यांनी आपण आज शनिवारी हा प्रश्न सोडवला नाही तर आपण आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.मात्र ते आपल्या प्रश्नावर अडुन बसले आहे.त्यामुळे महसूल प्रशासनासमोर पेच वाढला होता.मात्र उशिराने तहसीलदार भोसले यांनी हे पाझर तलाव भरून देण्याची हमी दिल्याने यावरील पेच संपुष्टात आला आहे.

  
तर आज निळवंडे प्रकल्पास निळवंडे कालवा कृती समितीच्या पाठपुराव्याने दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात अहंम भूमिका निभावणारे शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,शिर्डी येथील प्रांताधिकारी माणिक आहेर,कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,शिर्डी पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ आदींनी भेट दिली आहे.

सदर ‘आमरण उपोषण’ आगामी होऊ घातलेली कोपरगाव पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी हे केले असल्याची उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आढळून आली असून अनेक भेट देणाऱ्यांनी हे थेट बोलून दाखवले आहे.त्याबाबत रांजणगाव देशमुख परिसरात उलटसुलट चर्चा आढळून आली आहे.

    दरम्यान कोपरगाव येथील महसूल विभाग त्यांना पाणी पाझर तलावात नेण्यास त्यात येणारे अडथळे दूर करण्यास व अन्य मदत करण्यास तयार असल्याचे  दिसून आले आहे.अन्य प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाचे उपअभियंता गायकवाड यांचेशी आज दिवसभर काथ्याकूट करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यावर जलसंपदा विभाग त्यांनी पूर्ण केलेल्या कालव्यांचा पुंच्छ भागाशिवाय पुढील पाझर तलावांची हमी घेण्यास तयार नसल्याने पेच वाढला होता.मात्र शेवटी गट तहसीलदार भोसले यांनी त्याचे समाधान केल्याने हा पेच सुटला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस मिळाली आहे.

दरम्यान शेवटी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सहा आंदोलनकर्ते यांनी लहान मुलांच्या हस्ते लिंबूशरबत घेऊन आपले आंदोलन संपुष्टात आणले आहे.

   दरम्यान आज माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला असून त्या ठिकाणी त्यांनी राज्याच्या समन्यायी धोरणाचा समाचार घेऊन आपण हा प्रश्न आगामी काळात लावून धरण्याचे जाहीर केले असून त्यासाठी सर्व पक्षीय एकमत करण्याचे सूतोवाच केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close