जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…अन्यथा महसूल मंत्र्यांच्या घरी आंदोलन,आंदोलन कर्त्याचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील मौजे येसगाव येथील येवला नगरपरिषदेचे तलावाच्या गौण खनिजांची बेकायदा विक्री होत असून त्याच्या चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास माहिती अधिकार संजय काळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या समोर अखेर आंदोलन केले असून सदर चौकशीची मागणी तहसीलदार यांनी मान्य केल्याने अखेर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असले तरी याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर आपण राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या घरावर आंदोलन करू असा इशारा संजय काळे यांनी दिला आहे.

वरील दोन्ही संकल्पित छायाचित्र.

दरम्यान या प्रकरणी भाजपचा तालुका स्तरावरील बडा मासा सापडला असून त्यांना याकामी पालिकेचा एक माजी पदाधिकारी सामील असल्याची असल्याची नागरिकांत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.त्यामुळे या बाबत महसूल विभाग खरच कारवाई करणार का असा सवाल निर्माण झाला आहे.आता यात महसुली अधिकाऱ्याची कसोटी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील गौण खनिजा बाबद माहिती अधिकार संजय काळे यांनी आवाज उठवून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले त्याचे छायाचित्र.

कोपरगाव तालुक्यातील मौजे येसगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रं.७५२ जी शेजारील येवला नगरपरिषद,येवला यांचे मालकीच्या साठवण तलावाचे एकूण क्षेत्र ९.८७ एकर जमीन क्षेत्र आहे.सन-१९९३ मध्ये येवला नगरपरिषदेचे साठवण तलाव त्यांचे कामाचे नसल्यामुळे ते त्यांनी माणुसकी खातर कोपरगाव नगरपरिषदेला वापरण्यास दिले होते.त्या तळ्याची साठवण क्षमता ४.३० दश लक्ष घनफुट आहे.कोपरगांव नगरपरिषदेला या तळ्यातून कोपरगावचे जनतेसाठी पाणी पुरवठा करता येत होता,परंतु बेकायदेशीर रित्या येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व गौणखनिज तस्कर यांनी ९.७ एकर क्षेत्रावरील साठवण तलाव बुजवून मोठा साठा केला व त्या मुरूमाची राजरोज विक्री चालु आहे.याबाबत माहिती अधिकार संजय काळे यांनी आवाज उठवला होता.व स्वातंत्र्य दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र त्यांनी ते आज सकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या समोर सुरु केले असता त्याची दखल पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घेतली आहे.व त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले होते.

सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,व त्यांचे सहकारी हजर राहिले व त्यांनी या प्रकरणी चौकशी करून त्या ठिकाणी स्थळ पंचनामा करून अहवाल तयार केला जाईल व संस्थेवर अथवा व्यक्तीवर करावी केली जाईल”असे लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे त्यांनी आपले आंदोलन दि.१९ ऑगष्ट पर्यंत स्थगित केले आहे.मात्र सदरची चौकशी न केल्यास आपण राज्याचे महसूल मंत्री यांचे घरासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close