आंदोलन
…’त्या’ चोरांच्या शोधासाठी हाती तिरंगा घेणार -कोपरगावात इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मौजे येसगाव येथील येवला नगरपरिषदेचे तलावाच्या गौण खनिजांची बेकायदा विक्री होत असून त्याच्या चौकशीसाठी आपण मुरुमावर हातात तिरंगा झेंडा घेऊन गौण खनिज चोर शोधण्यासाठी उभा राहणार असल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी नुकताच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.व सदर चोर शोधण्यासाठी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना आवाहन केले आहे.
“गौण खनिजाचा मुरूमाचा मोठा साठा मुख्याधिकारी येवला नगरपरिषद यांनी काढून आणला,पाण्याचा साठवण तलाव बुजवून कोपरगावच्या जनतेचे पाण्याचे हाल का केले ? असा सवाल करून त्यांनी कोपरगावचे तहसिलदार,तलाठी,मंडलाधिकारी,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदी मान्यवर गप्प का आहेत ?-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.
त्यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी याना पाठवलेले निवेदनात पुढे म्हटले आहे की,”मौजे येसगाव ता. कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रं.७५२ जी शेजारील येवला नगरपरिषद,येवला यांचे मालकीच्या साठवण तलावाचे एकूण क्षेत्र ९.८७ एकर जमीन क्षेत्र आहे.सन-१९९३ मध्ये येवला नगरपरिषदेचे साठवण तलाव त्यांचे कामाचे नसल्यामुळे ते त्यांनी माणुसकी खातर कोपरगाव नगरपरिषदेला वापरण्यास दिले होते.त्या तळ्याची साठवण क्षमता ४.३० दश लक्ष घनफुट आहे.कोपरगांव नगरपरिषदेला या तळ्यातून कोपरगावचे जनतेसाठी पाणी पुरवठा करता येत होता,परंतु बेकायदेशीर रित्या येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व गौणखनिज तस्कर यांनी ९.७ एकर क्षेत्रावरील साठवण तलाव बुजवून मोठा साठा केला व त्या मुरूमाची राजरोज विक्री चालु आहे.
संकल्पित छायाचित्र.
“सदर तलावातील बेकायदेशीर मुरूम साठा झाल्याने कोपरगाव शहराला वर्तमानात ९.८७ एकरातील पाणी मिळण्याचे बंद झाले.ह्या बद्दल मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांनी कोणतीही वाच्यता केलेली नाही.त्यामुळे ह्या मुरूम साठ्यात त्यांचा देखील सहभाग आहे काय ? -संजय काळे.माहिती अधिकार कार्यकर्ते.कोपरगाव.
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे व तहसिल कार्यालय ह्या मुरूमाच्या काळ्या बाजाराकडे अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे अशी चर्चा असल्याचा दावा केलेला आहे.सदर साठवण तलावात मुरुमाचा साठा झाल्यामुळे कोपरगाव शहर पाणी पुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या साठवण तलाव क्रं.५ चे खोदकाम चालू आहे.परंतु सदर अभियंत्यानीं या तलावातील खोदलेला मुरूम पाच कि.मी.पेक्षा लांब,नेऊन टाकला अशी नोंद मोजमाप नोंदी पुस्तकात टाकली असल्याचे सांगितले आहे.येवला नगरपरिषदच्या साठवण तलाव पाच नंबर तलावा पासून केवळ अर्धा कि.मी.अंतरावर असल्यामुळे तो मुरूम हा नसणार हे उघड आहे.कारण कोपरगाव नगरपरिषदेने मुरूम वाहतुकीचे दर अर्धा कि.मी. व पाच कि.मी. साठी निविदेत वेगळे धरलेले आहे.
त्यामुळे येवढा मोठा मुरूमाचा साठा मुख्याधिकारी येवला नगरपरिषद यांनी काढून आणला,पाण्याचा साठवण तलाव बुजवून कोपरगावच्या जनतेचे पाण्याचे हाल का केले ? असा सवाल करून त्यांनी कोपरगावचे तहसिलदार,तलाठी,मंडलाधिकारी,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदी मान्यवर गप्प का आहेत ? असा सवाल विचारला आहे.
बेकायदेशीर मुरूम साठा झाल्याने कोपरगाव शहराला ९.८७ एकरातील पाणी मिळण्याचे बंद झाले.ह्या बद्दल मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांनी कोणतीही वाच्यता केलेली नाही.त्यामुळे ह्या मुरूम साठ्यात त्यांचा देखील सहभाग आहे काय ? याचा शोध घ्यावा लागणार आहे.गेले संपूर्ण महिना ह्या ठिकाणावरून मुरूमाचा गौण खनिजांचा उपसा करून विकला जात आहे.ती यंत्रणा कुणाची ? तो गौणखनिज चोर कोण आहे ? शासनाची स्वामित्व हक्क कर व वाहतुक कर चुकवणारे कोण ? याचा शोध घ्यावा व सदर ठिकाणचा पंचनामा करावा जमीन मालकावर गुन्हा दाखल करावा असे आवाहन संजय काळे यांनी शेवटी केले आहे.