जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

बिबट्याचा संचार,आता राजकीय आखाड्यात !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्याजवळ बिबट्याचा संचार अद्याप कायम असून आज त्याने जेऊर पाटोदा आणि मुर्शतपुर आदी परिसरात त्याने दोन दिवसात तीन शेळ्यांची शिकार त्याने केली असून त्यासाठी वन विभागाने धारणगाव रस्त्यालगत संशियत ठिकाणी पिंजरा लावला असताना त्याला अपयश आल्याच्या निषेधार्थ आज मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत स्वतःला पिजऱ्यात कोंडून घेतले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील बिबट्या आता राजकीय आखाड्यात घुसला असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु झाली आहे.

बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी कोपरगाव वन विभागाच्या वतीने धारणगाव रोड परिसरात असलेल्या ‘श्रद्धा पॅराडाईज’ या इमारती जवळ पिंजरा लावला असून त्यात तो जेरबंद झाला नाही त्या निषेधार्थ मनसेने लक्षवेधी आंदोलन केले आहे.त्यात अनिल गायकवाड यांनी पिंजऱ्यात बसून वन विभागाचे लक्ष वेधून घेतले आहे व वन विभागाच्या अकार्यक्षमतेवर टीका केली आहे.शेवटी त्यांनी आपण राज्याच्या वन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.मात्र कोपरगाव शहरात बिबट्या आल्याची घटना दुर्मिळ समजली जात असून तो बिबट्या जेऊर पाटोदा परिसरात काटवन असल्याने त्या ठिकाणी दिवसा लपून बसत आहे.त्यामुळे तो वर्तमानात हलण्यास तयार नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे.कोपरगाव आणि जेऊर पाटोदा,मुर्शतपुर आदी परिसरात ठिय्या दिला असून या परिसरातील मोठया प्रमाणावर डुकरे,कुत्री,शेळ्या आदीची शिकार तो करत आहे.सहज सापडत असल्याने त्याने त्याच परिसरात ठिय्या दिला आहे.गत दोन-तीन दिवसात त्याने जेऊर पाटोदा परिसरात दोन शेळ्या आपल्या शिकार बनवल्या आहेत त्यातील दोन शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत तर मुर्शतपुर या ठिकाणी त्याने एक शेळी शिकार बनवली असून ती शेजारच्या उसाच्या शेतात ओढुन नेली आहे.त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव वन विभागाच्या अधीकारी प्रतिभा सोनवणे यांनी त्यास दुजोरा दिला आहे त्यांनी वन विभागाच्या वतीने धारणगाव रोड परिसरात असलेल्या ‘श्रद्धा पॅराडाईज’ या इमारती जवळ पिंजरा लावला असून त्यात तो जेरबंद झाला नाही त्या निषेधार्थ मनसेने लक्षवेधी आंदोलन केले आहे.त्यात अनिल गायकवाड यांनी पिंजऱ्यात बसून वन विभागाचे लक्ष वेधून घेतले आहे व वन विभागाच्या अकार्यक्षमतेवर टीका केली आहे.शेवटी त्यांनी आपण राज्याच्या वन विभागाकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे आता वन विभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close