जाहिरात-9423439946
सहकार

…या साखर कारखाना व्यवस्थापनाच्या गैरव्यवहाराची चौकशी करा-शेतकरी संघटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

अशोक कारखाना प्रशासनाने ऊसापासून साखर निर्मिती प्रक्रीया व ऊस तोड खर्चात नियमबाह्य वाढ करून सुमारे ८४ कोटी रूपयांचा गैरव्यव्हार केला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकांनव्ये केला आहे.

“शासनाने साखर उतारा,तोड वाहतूक खर्च व कच्च्या साखर निर्यातीबाबत दर ठरवून दिलेले नसल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखाना व्यवस्थापनांकडून कमी अधिक प्रमाणात गैरव्यवहार केला जातो.विशेष म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण जिल्ह्याच्या बरोबरीने दर दिल्याचे सांगून प्रत्येक कारखान्याकडून ऊस उत्पादकांची कायदेशीर लूट केली जाते”-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.

याप्रकरणी कॅग व ईडी मार्फत कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्यासह व्यवस्थापन समितीची चौकशी करण्याची मागणी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,”राज्य शासनाच्या साखर आयुक्तांनी ऊसापासून साखर निर्मिती प्रक्रीयेचा खर्च ३१९ रूपये मेट्रीक टन ठरवून दिलेला आहे.मात्र असे असताना अशोक कारखाना प्रशासनाने २०२०-२१ गळीत हंगामात १३३६.०४ इतका अधिक दाखवला आहे.आदर्श मानकापेक्षा या खर्चात १०१७.०४ इतका फुगवटा दिसून येत आहे.संबंधित हंगामात कारखान्याने ६ लाख ९० हजार ५ टन गाळप केले.या फुगवट्यामुळे तब्बल ७० कोटी १६ लाख ६२ हजार ६८५ इतका मोठा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे.या गाळप हंगमाच्या लेखा परिक्षणाचे काम अहमदनगर येथील बी.जे.गायकवाड ॲण्ड कंपनीस देण्यात आले.त्यांनी दिलेल्या लेखा परिक्षण अहवालात मेट्रीक टनामागे १०१७.०४ रूपये इतका अतिरिक्त खर्च दाखविण्यात आल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कारखाना व्यवस्थापनाने हे विषय मंजुरीसाठी विषय पत्रिकेवर ठेवले.यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे व जिल्हाध्यक्ष औताडे यांनी आक्षेप घेतला.तरीही मनमानी पद्धतीने हे विषय मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय ऊस तोड खर्चातही असाच गैरव्यव्हार झाल्याचे वरील अहवालावरून स्पष्ट होते. २०२१-२२ हंगामात ८ लाख ५२ हजार ७९२ मेट्रीक टन गाळप झाले.मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी व्यवस्थापनाने १५२ रूपये जास्त दाखविले आहे.त्यामुळे १२ कोटी ९३ लाख २४ हजार ३४८ रूपयांची तफावत निर्माण झाली आहे.
यासह कारखान्याने इलेक्ट्रॉनिक संगणकीकृत वजन काट्याचे काम अहमदनगर येथील स्टील ब्रीज वेईंगींग टेक्नॉलॉजी या कंपनीस दिले आहे.या कामाचा मेन पासवर्ड कारखान्याकडे असणे आवश्यक असताना तो कंपनीकडे असल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे. याबाबतही लेखापालाने आक्षेप नोंदविला आहे.यावरून ऊस वजनात कंपनी व कारखान्याच्या संगनमताने काटामारी होत असल्याचा आरोप औताडे यांनी केला आहे.याबाबतही शासनाने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वरील सर्व प्रकरणी कारखान्याची चौकशी केंद्र सरकारच्या नियंत्रक व महालेखा परिक्षक अर्थात कॅग व माजी आ.मुरकुटेंसह कारखाना व्यवस्थापन समीतीची सक्त वसुली संचनालय अर्थात ईडी मार्फत करावी अशी मागणी साखर आयुक्तांकडे औताडे व जगताप यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close