जाहिरात-9423439946
सण-उत्सव

गावात ग्रामस्थ हेच सरकार- सब्बन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गावात ग्रामस्थ हेच सरकार असून ग्रामस्थांनी त्यावर लक्ष केंद्रित करून आपला विकास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे अध्यक्ष अशोक सब्बन यांनी कोऱ्हाळे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पंजाबमध्ये पाणी खूप आहे पण विकासाला गालबोट आहे.ते म्हणजे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे.भटिंडा येथे प्रत्येक रेल्वे कॅन्सरची असते त्यात येणारा-जाणारा प्रत्येक माणूस कँसरचा रुग्ण आहे,म्हणून तिला,’कॅन्सर रेल्वे’ असे नाव पडले आहे.मग तुम्हाला नेमके काय हवे”-अशोक सब्बन,अध्यक्ष,भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्ताने निळवंडे कालवा कृती समितीच्या को ऱ्हाळे शाखेच्या वतीने जेष्ठ कार्यकर्ते सोमनाथ दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे घटनेचे पूजन भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे अध्यक्ष अशोक सब्बन यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रा.एल.एम.डांगे,कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,समितीचे जेष्ठ नेते सोमनाथ दरंदले,डॉ.शिंदे दीपक,ज्ञानेश्वर चौधरी,बुद्धिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश निकम,जनार्दन शेजुळ,ग्रामसेवक संजय कहांडळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ग्रामसभांना व्यापक अधिकार दिले आहे.त्यातून ग्रामस्थांचा विकास करण्याचा अधिकार दिला आहे.ग्रामसभांना विचारल्याशिवाय एक रुपये खर्च करण्याचा अधिकार संबंधित सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.गावांचा विकास करण्याचा अधिकार दिला असताना सवाल विचारण्याचा अधिकार दिला आहे.लेखमेंढणा गावाची जमीन संपूर्ण ग्रामसभेच्या नावावर आहे.वन उपज यातून लिलाव करून संपूर्ण उत्पन्न गावाला दिले जाते.अण्णा हजारे यांनी हेच राळेगण सिद्धी येथे केले आहे.गावात ५५० विंधन विहीरी घेतल्या होत्या.सतत तीन दिवस ग्रामसभा घेऊन सर्व बोअर बंद करण्याचा निर्णय घेतला व ३५० बोअर बुजवले आहे.फक्त पिण्यासाठी परवानगी दिली बाकी पाणी मोजून पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे विहिरीचे भूजल पातळी वाढली आहे.पाणी वाढल्याने सर्वांना समान न्याय मिळाला आहे.७३ व्या घटना दुरुस्तीचे काम एवढे सोपे नव्हते तीन दिवस अण्णांनी उपोषण केले त्यावेळी ती घटना दुरुस्ती केली.आता ग्रामसभा घेण्याचे काम आपले आहे.विकास कामांचा आढावा ग्रामस्थांनी व ग्रामसभांनी घेतला पाहिजे.राज्याचे चौदा विभागाचे काम ग्रामपंचायतींवर सोपवले आहे.आरोग्य,शिक्षण रोजगार,आरोग्य,ग्रामविकास,पशुसंवर्धन आदींचा समावेश आहे.गावात ग्रामस्थ हेच सरकार आहे.”हमारे गाव मे हम ही सरकार” हे ध्यानी घेतले पाहिजे.प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक जण विकासाचा दावा करतात पण विकास म्हणजे काय ? प्रत्येक जण जिवंत असेल तर त्याचा विकास करायला हवा असे सांगून त्यांनी हवा,जल,वृक्ष,पशु,जमीन,ग्रामस्थ यांचा विकास करायला हवा.

त्यावेळी पंजाब मधील वास्तव सांगताना ते म्हणाले की,”पंजाबमध्ये पाणी खूप आहे पण विकासाला गालबोट आहे.ते म्हणजे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे.भटिंडा येथे प्रत्येक रेल्वे कॅन्सरची असते त्यात येणारा-जाणारा प्रत्येक माणूस कँसरचा रुग्ण आहे,म्हणून तिला,’कॅन्सर रेल्वे’ असे नाव पडले आहे.मग तुम्हाला नेमके काय हवे असा रास्त प्रश्न विचारला आहे.आजही गावोगाव रस्ते नाही,बलोद्यान नाही,व्यायाम शाळा नाही,हे कशाचे वास्तव आहे.आम्ही रस्ते,गटार,हायमॅक्स यावर आम्ही थांबलो आहे.आईन्सटाईन याने सांगितले,”ज्या दिवशी मधमाश्या नष्ट होतील त्या दिवशी मानवजात नष्ट होईल” हे का सांगितले याचा विचार करणार आहे की नाही.कोरोना कालखंडात जवळची माणसे मेली.कारण आमची रोग प्रतिकारक शक्ती नष्ट झाली हे त्याला कारण आहे.कुपोषण झाले आहे.यावर काम कोण करणार आहे.आजही अंगणवाडी सेविका येऊन आम्हाला शेंगदाणे,गुळ खाण्यास सांगतात.
गावात पिण्यास येणारे पाणी आम्ही केवळ दहा टक्के योग्य वापरतो,बाकी वाया घालवतो.यातील नव्वद टक्के पाणी वाचवले तर दुष्काळ हटेल.यातून पाणी वाचवून वृक्षलागवड करू शकतात.आमचा दृष्टिकोन बदला.विकास होईल.गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करा व प्रत्येकाचा हिमोग्लोबिन वाढवा रोग नाहीसे होतील.आरोग्यावर होणारा खर्च वाचेल असे आवाहन त्यांनी केले आहे.
आगामी काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्ताचा कायदा मंजूर करणार आहे.सेवा हमी कायदा मंजूर करून घेतला आहे.माहिती अधिकार मंजूर करून घेतला आहे.यातून लोकशाही मजबूत होईल असे आवाहन त्यांनी केले आहे.ग्रामसभेत मागील ठराव वाचले पाहिजे,त्याला मंजुरी दिली पाहिजे.त्याबाबत सजग राहिले पाहिजे तरच भ्रष्टाचार थांबू शकेल.कायदे आम्हाला माहिती नाही म्हणूंन आमचे आर्थिक शोषण होते.आम्ही देशाचा कारभार चालू शकतो तर गावाचा का करू शकत नाही.मनरेगा मधील वसूल केलेल्या शंभर रुपयातील चाळीस रूपये केंद्राला पाठवतो पण त्यातून आम्हाला केवळ सहा रुपये येतात बाकी निधी इतरत्र वापरला जातो त्यातून अनेक विकास कामे करू शकतो.याबाबत जागृती करणे गरजेचे आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.एल.एम.डांगे,तर सूत्रसंचलन कहांडळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ दरंदले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close