जाहिरात-9423439946
बाजार भाव

वाढत्या खर्चामुळे ७६ टक्के नागरिकांचं जगणं अवघड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबईः
कंटारच्या ‘ग्लोबल इश्यूज बॅरोमीटर’नुसार ७६ टक्के शहरी ग्राहकांना दररोजच्या वाढत्या खर्चामुळे आयुष्यातल्या मोठ्या योजना पुढे ढकलणं किंवा सोडून देणं भाग पडलं आहे.खाण्या-पिण्याच्या किंमती वाढत असल्याने बचत ही त्यांच्यासाठी दुरापास्त झाली आहे.

किरकोळ महागाईमुळे ग्राहकांकडे क्रयशक्ती राहिलेली नाही.याची भरपाई करण्यासाठी शहरी ग्राहक त्यांच्या मोठ्या योजनांना उशीर करत आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.शहरी लोक खर्चात कपात करत आहेत आणि पैशाची काळजी घेत आहेत.परंतु ते भविष्याबाबतही काळजीमध्ये आहेत.

अहवालानुसार,ग्राहक आता मोबाईल फोन,टिकावू महाग वस्तू आणि कारसारख्या महागड्या वस्तूंवर कमी खर्च करत आहेत.शिवाय ते त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी किंवा मुलांच्या शालेय शिक्षणासाठी भविष्यासाठी बचत करण्याऐवजी आज आणि आताच्या खर्चाला प्राधान्य देत आहेत.कंटारच्या अहवालानुसार,यामुळेच शहरी लोकांमध्ये जीवन योजना आणि राहणीमानाचा खर्च चिंतेचा विषय बनत आहे.अनेकांना दैनंदिन खर्च भागवणं कठीण जात असल्याचं अहवालात म्हटलं आहे.सुमारे ३५ टक्के ग्राहकांनी नोंदवलं की,त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावत आहे.

किरकोळ महागाईमुळे ग्राहकांकडे क्रयशक्ती राहिलेली नाही.याची भरपाई करण्यासाठी शहरी ग्राहक त्यांच्या मोठ्या योजनांना उशीर करत आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.शहरी लोक खर्चात कपात करत आहेत आणि पैशाची काळजी घेत आहेत.परंतु ते भविष्याबाबतही काळजीमध्ये आहेत.भारतीय ग्राहकांना वाटतं की लवकरच परिस्थिती सुधारून महागाई नियंत्रणात येईल.त्यामुळेवाढत्या किमती डंख मारत असल्या तरी लोक अजूनही आर्थिक दृष्टिकोनाबद्दल उत्साहित आहेत.शहरी भारतीयांना वाटतं की सरकार,सामान्य जनता आणि व्यवसायांनी आर्थिक संकटाचा सामना करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.ही विचारसरणी जगभरातल्या ग्राहकांच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध आहे.

सुमारे ३७ टक्के शहरी भारतीयांनी रशिया-युक्रेन युद्ध ही सध्याची सर्वात मोठी चिंता असल्याचं नमूद केलं.त्यानंतर २९ टक्के शहरी भारतीयांनी आर्थिक आव्हानं मोठी मानली आहेत.कांटरच्या अहवालानुसार,पर्यावरण आणि हवामानाची चिंताही पहिल्या तीन क्रमांकांवर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close