जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘त्या’संघटनेच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता,शेतकऱ्यांत समाधान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर चौकात मुळा-प्रवरा कॉ.ऑफ सोसायटीच्या थकीत वीज बिल व अतिरिक्त भारनियमन या विरुद्ध केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्याची सुनावणी नुकतीच कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली होती त्यातील आरोपी शिवाजी जवरेंसह पाच आंदोलनकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान या रास्ता रोकोच्या घटनेत पोलिसांनी त्यांच्यावर दगडफेक,धक्काबुक्की,शिवीगाळ,सरकारी कामात अडथळा आणला,जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे,प्रवरा बँकेचे माजी संचालक रमेश पन्हाळे,काकासाहेब बेंद्रे,अरुण सुपेकर,अशोक गाडेकर आदी पाच जणांविरुद्ध आरोप ठेऊन गुन्हा दाखल केला होता.त्याना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची वाट लागली होती.शिवाय थकीत वीज बिल वसुलीचा महावितरण कंपनीचे देण्याचा व मागणीचा सपाटा सुरु ठेवला होता.त्याविरुद्ध शेतकरी संघटनेने दि.१० ऑक्टोबर २०१० रोजी राहाता तालुक्यातील बाभळेश्वर चौकात महापारेषण २२० के.व्ही.च्या प्रवेश द्वारासमोर ‘रास्ता रोको’आंदोलन पूकारले होते.

दरम्यान या घटनेत पोलिसांनी त्यांच्यावर दगडफेक,धक्काबुक्की,शिवीगाळ,सरकारी कामात अडथळा आणला,जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे,प्रवरा बँकेचे माजी संचालक रमेश पन्हाळे,काकासाहेब बेंद्रे,अरुण सुपेकर,अशोक गाडेकर आदी पाच जणांविरुद्ध आरोप ठेऊन गुन्हा दाखल केला होता.

त्याबाबत लोणी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी म्हणून शिवाजी जवरे,यांचेसह पाच जणांवर भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,३४१,३५३,३३२,३३७,१८८,३४१,मुंबई पोलीस ऍक्ट अ-३७(१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर खटला तब्बल १३ वर्ष चालविण्यात आला होता.त्यात आरोपींच्या वतीने राहता न्यायालायत अड्.काकासाहेब गोरे,अड्.बेंद्रे,अड्.पठारे,अड्.घोरपडे,अड्.धनवटे आदींनी काम पाहिले होते.त्यानंतर सदर गुन्हा जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला होता.

दरम्यान तेथे अड्.टेके व अड्.सुपेकर आदींनी काम पाहिले होते.त्यात कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय संभाजी कोऱ्हाळे यांनी जवरे यांच्यासह पाचही आरोपीना निर्दोष मुक्त केले आहे.या न्यायालयीन निकालाचे शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष अड्.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले आदींनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close