जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

मृत्यूनंतरही रुग्णाला कोविडचे उपचार,पैशासाठी डॉक्टरांचे बनाव उघड

जाहिरात-9423439946


न्यूजसेवा

कोपरगाव- (नानासाहेब जवरे)

नगर शहरातील सावेडी भागात असलेल्या डॉ.गोपाळ बहुरुपी आणि डॉ.सुधीर बोरकर संचलित न्युक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड केअर सेंटर येथे रुग्णाला मृत्यू नंतरही कोविडचे उपचार दिले गेल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून,डॉक्टरांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे साधा आजार असलेल्या रुग्णाला कोविडचा उपचार दिला असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठासमोर उघड झाली असून यात सम्बधित रुग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

सिव्हील सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने संबंधित दोन्ही रुग्णालयावर आणि त्यांच्या कारभारावर ताशोरे ओढल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून,या घटनेमध्ये शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या या समितीने या गंभीरबाबी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे बोगस प्रॉक्टीस करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने अड्.अजित काळे हे काम पहात आहेत.




सदरचे सविस्तर वृत्त असे की,बबनराव नारायण खोकराळे, वय-(७९) रा.हनुमाननगर,सावेडी, नगर असे मृत्यू पावलेल्या रुग्णाचे नाव असून,सदर रुग्णाच्या मुलाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने येथील शासकीय यंत्रणेला या संदर्भात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्या नुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाने चौकशी समिती नेमुन याबाबतचा अहवाल न्यायालयास सादर केला आहे त्यात हि धक्कादायक बाब उघड झाली आहे.
   या अहवालात संदर्भिंत समितीने न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड केअर सेंटर येथील डॉ.गोपाळ बहुरुपी आणि डॉ.सुधीर बोरकर यांचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे.स्वत: सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहा जणांच्या डॉक्टरांच्या समितीने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालामध्ये उपरोक्त दोन्ही रुग्णालयांच्या दुर्लक्षापणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.रुग्णाचा कुठलाही प्रकारचा आरटीपीसीआर रिपोर्ट नसताना रुग्णाला कोविडची ट्रिस्टमेंट दिली गेली.नातेवाईक,अथवा रुग्ण यांची कुठल्याही प्रकारची संमती न घेता रुग्णास एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.रुग्णाची सद्य परिस्थिती नातेवाईकांना त्या रुग्णालयातील डॉक्टर अथवा संबंधित व्यवस्थापनाने नातेवाईकांना कळविलेले नाही.वास्तविक पाहता रुग्णाला रेमडिसिव्हर देतांना काही शासकीय प्रोट्रोकॉल यांचे पालन करणे आवश्यक असते.एकाच दिवशीच्या आसपास रुग्णाला पाच रेमडिसिव्हर दिल्यामुळे रुग्णाची अवस्था गंभीर झाली.एकाच रुग्णालयात दोन वेगवेगळ्या वेळांना रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.दोन्ही मृत्यू नोंदी वेगवेगळ्या वेळांचे असूनही त्याबाबतही संबंधित समितीने न्यायालयाच्या निर्दशानास ही बाब आणून दिली.
     याशिवाय रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली गेलेली नाही हे  विशेष ! शिवाय मृत्यू बाबतचे कुठल्याही प्रकारचे दप्तर संबंधित हॉस्पिटलने जतन करुन ठेवलेले नाही.मृत देहाची विल्हेवाट लावण्याबाबत तफावत आढळून आल्याचे संबंधित समितीने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
    गंभीर बाब म्हणजे कोविडची आरटीपीसीआर टेस्ट न करताही संबंधित रुग्णाला कोविडचे उपचार देऊ केले. आणि रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला कोविडचे उपचार दिले गेल्याचे न्यायालयाच्या या समितीने निदर्शनास आणून दिलेले आहे.
   याबाबत रुग्णाचा मुलगा अशोक बबनराव खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड.अजित काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली असून अहमदनगर कोविड सेंटर आणि न्युक्लिअस हॉस्पिटल या शहरातील दोन्ही रुग्णालयांचे परवाने रद्द करुन संबंधित दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करुन न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.
    याबाबत यापुर्वीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात या दोन्ही हॉस्पिटलला मदत करणाऱ्या कृष्णा लॅबवर गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याचा तपासही प्रलंबित आहे.तरी या सर्व कटात सहभागी असणाऱ्या सर्व दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन न्याय द्यावा अशी विनंती देखील खोकराळे यांनी उच्च न्यायालयाला केलेली आहे.

सिव्हील सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने संबंधित दोन्ही रुग्णालयावर आणि त्यांच्या कारभारावर ताशोरे ओढल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून,या घटनेमध्ये शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या या समितीने या गंभीरबाबी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे बोगस प्रॉक्टीस करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close