जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगावातील ‘त्या’ गुंह्यातील आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विष्णू चित्र मंदिराजवळ अनोळखी मुलीबरोबर आरोपी बोलत असताना त्यांच्यावर भ्रमणध्वनीची विजेरी लावून पाहिले याचा आरोपी नकुल धर्मराज ठाकरे यास राग येवुन त्याने व त्याचे साथीदार अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील रा.गांधीनगर व मयूर अनिल गायकवाड रा.हनुमाननगर अशांनी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र आकाश राजेंद्र दगडे रा.गोदाम गल्ली कोपरगांव अशांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन दुखापत केल्याच्या घटनेतील दुसरा आरोपी अजय पाटील यास नुकतीच कोपरगाव शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्यास आज कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले करून पाच दिवसांची पोलीस रिमांड मागितला असता दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण आरोपी यास ०५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी अभियोक्ते एस.ए.व्यवहारे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

यातील आरोपी नकुल ठाकरे यास पोलिसांनी दि.०२ सप्टेंबर रोजी अटक केली होती.तो न्यायालयीन कोठडीत आहे.त्याने चौकशी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीत आरोपी अजय पाटील याचे नाव सांगितले आहे.त्याला आज पहाटे ०३.१५ पोलिसानी अटक केली असून आज त्यास कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.०२ समोर हजर केले असता कोपरगाव शहर पोलिसांनी त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मागितली होती त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या विष्णू मंदिरासमोर व साईबाबा व मुंजोबा मंदिराजवळ दि.२२ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी नकुल ठाकरे हा व एक अनोळखी मुलगी बोलत उभे असताना तेथे फिर्यादी शुंभम सोनवणे याने त्यांच्यावर आपल्या भ्रमणध्वनीच्या विजेरीतून प्रकाश झोत टाकून त्यांना पहिले असता त्याचा आरोपीस राग आला व त्याने व त्याचे अनोळखी दोन मुले यांनी फिर्यादी सोनवणे व त्याचा मित्र आकाश राजेंद्र दगडे रा.गोदामगल्ली अशांना शिवीगाळ केली व त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व दुखापत केली आहे.व फिर्यादीचा एक पाच हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा काळ्या रंगाचा भ्रमणध्वनी व त्यातील भारत संचार निगम कंपनीचे सिम कार्ड आदी हिसकावून नेले होता.या प्रकरणी फिर्यादी सोनवणे याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गु.र.क्रं.२३०/२०२१ भा.द.वि.कलम ३२७,३४ प्रमाणे दाखल केला होता.

दरम्यान यातील आरोपी नकुल ठाकरे यास पोलिसांनी दि.०२ सप्टेंबर रोजी अटक केली होती.तो न्यायालयीन कोठडीत आहे.त्याने चौकशी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीत आरोपी अजय पाटील याचे नाव सांगितले आहे.त्याला आज पहाटे ०३.१५ पोलिसानी अटक केली असून आज त्यास कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.०२ समोर हजर केले असता कोपरगाव शहर पोलिसांनी त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मागितली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यास दि.१४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपीच्या वतीने अड्.ठोळे यांनी तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले आहे.दुसरा आरोपी मयूर अनिल गायकवाड रा.१०५ हनुमान नगर हा अद्याप फरार आहे.त्याचा शहर पोलीस शोध घेत आहेत.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close