जाहिरात-9423439946
निवड

जिनिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी गोरक्षनाथ ज्ञानदेव जामदार यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष भास्करराव सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सदर प्रसंगी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना महेश लोंढे यांनी मांडली त्या सूचनेस पाराजी गवळी यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना गणेश गायकवाड यांनी मांडली व त्या सूचनेस नानासाहेब चौधरी यांनी अनुमोदन दिले आहे त्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव थोंबळ,सहाय्यक निवडणूक अधिकारी ए.आर.रहाणे यांनी केली आहे.

कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची सन-२०२३-२०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संस्थेचे मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी ए.आर.रहाणे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.

यावेळी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना महेश लोंढे यांनी मांडली त्या सूचनेस पाराजी गवळी यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना गणेश गायकवाड यांनी मांडली व त्या सूचनेस नानासाहेब चौधरी यांनी अनुमोदन दिले आहे.
यावेळी सर्व सदस्यांच्या अनुमतीने अध्यक्षपदी गोरक्षनाथ जामदार यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी जाहीर केले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,नवनिर्वाचित संचालक सचिन आव्हाड,गणेश गायकवाड,पाराजी गवळी,नानासाहेब चौधरी,संदीप शिंदे,नानासाहेब निकम,महेश लोंढे,संजय संवत्सरकर,शंकर गुरसळ,विमलबाई गवारे,कांताबाई दहे उपस्थित होते. निवडणुककामी संस्थेचे महाव्यवस्थापक सुरेश काशिद यांनी सहकार्य केले.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना माजी आ.काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी आ.काळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close