जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव तालुक्यातील …या वि.का.सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव पाटी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मढी बु.च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूक संपन्न होऊन पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ,तर उपाध्यक्ष पदासाठी तुषार बबनराव गमे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मढी बु.या सोसायटीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ उपाध्यक्ष पदासाठी तुषार बबनराव गमे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर.एन.रहाणे यांनी अध्यक्ष ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ व उपाध्यक्ष पदी तुषार बबनराव गमे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव पाटी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मढी बु.च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूक माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्य मंडळात ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ,तुषार बबनराव गमे,ज्ञानदेव कचरू गवळी,तुकाराम विठ्ठल चव्हाण,एकनाथ गंगाधर गवळी,विमलबाई नानासाहेब गवळी,रामराव रखमाजी गवळी,ज्ञानदेव पांडूरंग कुऱ्हाडे,भागवत बहिरू मोकळ,रावसाहेब केशव चव्हाण,प्रवीण श्रीराम निंबाळकर हिराबाई नामदेव कुऱ्हाडे या काळे गटाच्या सदस्यांचा समावेश आहे.

या सोसायटीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ उपाध्यक्ष पदासाठी तुषार बबनराव गमे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर.एन.रहाणे यांनी अध्यक्ष ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ व उपाध्यक्ष पदी तुषार बबनराव गमे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले यावेळी सचिव नारायण राजगुरू यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.

सदर प्रसंगी कोळगाव पाटी व मढी बु.चे सोसायटी सभासद व माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ,उपाध्यक्ष तुषार बबनराव गमे व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. काळे यांनी अभिंनदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close