जाहिरात-9423439946
निवडणूक

विकास मंडळ दूरुस्ती करतांना इतरमागास वर्गीय,भटके विमुक्तांवर अन्याय-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळावर गेल्या प्राथमिक शिक्षक विकास मंडळावर गेल्या सहा वर्षांपासुन रावसाहेब रोहोकले गुरुजी यांचे नेतृत्वाखालील,’गुरुमाऊली मंडळा’ची एक हाती सत्ता असताना त्यांनी संचालक मंडळाची पुनर्रचना करताना इतर मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त याना जागाच दिली नसल्याचा आरोप सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे व रवींद्र पिंपळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

“साधारणतः कोणत्याही सहकारी संस्थेतील विश्वस्तांची संख्या ही विषम ठेवतात. प्राथमिक शिक्षक बँकेप्रमाणेच २१ विश्वस्त ठेऊन ओबीसी १,भटके विमुक्त १ व महिला प्रतिनिधी २ जागा ठेवाव्यात म्हणजे २१ विश्वस्त होतील,असे सदिच्छा मंडळाने सुचवले होते,परंतु कधीही कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विकास मंडळाच्या नेतृत्वाने कुणाचेही न ऐकता इतरमागासवर्गीय (ओबीसी) व भटके विमुक्तांना एकही जागा दिली नाही”-राजेंद्र शिंदे,नेते,सदिच्छा मंडळ.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”अ.नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळावर गेल्या प्राथमिक शिक्षक विकास मंडळावर गेल्या सहा वर्षांपासुन रावसाहेब रोहोकले गुरुजी यांचे नेतृत्वाखालील,’गुरुमाऊली मंडळा’ची एक हाती सत्ता आहे.मागील सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ‘विकास मंडळ’ या संस्थेसाठी १७ विश्वस्त निवडुन दिले होते.त्यात सर्वसाधारण १४ विश्वस्त,नगरपालिका,महानगरपालिका,भिंगारकॅन्टोंन्मेंट यापैकी १ विश्वस्त,अनुसुचित जाती,जमाती पैकी एक विश्वस्त व महिला प्रतिनीधी पैकी एक विश्वस्त अशी रचना होती.

जुलै २०२२ ची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी विश्वस्त मंडळाने विकास मंडळ घटना दूरुस्तीचा घाट घातला.त्यात सर्वसाधारण जागा १४,नगरपालिका,महानगरपालिका,भिंगार कॅन्टोंनमेन्ट १जागा,अनुसुचित जाती १ जागा,अनुसुचित जमाती १ जागा,व महिला प्रतिनिधी १ जागा असा बदल करण्यात येऊन,एकुण १८ विश्वस्त अशी रचना करण्यात आली.साधारणतः कोणत्याही सहकारी संस्थेतील विश्वस्तांची संख्या ही विषम ठेवतात. प्राथमिक शिक्षक बँकेप्रमाणेच २१ विश्वस्त ठेऊन ओबीसी १,भटके विमुक्त १ व महिला प्रतिनिधी २ जागा ठेवाव्यात म्हणजे २१ विश्वस्त होतील,असे सदिच्छा मंडळाने सुचवले होते,परंतु कधीही कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विकास मंडळाच्या नेतृत्वाने कुणाचेही न ऐकता इतरमागासवर्गीय (ओबीसी) व भटके विमुक्तांना एकही जागा दिली नाही,त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ओबीसी व भटके विमुक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली असल्याचा दावा केला आहे.

येत्या जुलै महिन्यात होणार्‍या निवडणुकीत गुरुमाऊली मंडळाला सर्वच सभासद धडा नक्कीच शिकवतील,सर्व सभासदांनी गुरुमाऊली मंडळाला याचा जाब विचारावा असे आवाहन सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे,रविंद्र पिंपळे,ऊच्चाधिकार समितिचे जिल्हाध्यक्ष गजानन ढवळे,संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे,सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत,जिल्हा शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे,रहिमान शेख,राजाभाऊ बेहळे,सुभाष खेडकर,सुरेश खेडकर,विनोद फलके,चंद्रकांत मोरे,भास्कर कराळे,बबन गाडेकर यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close