जाहिरात-9423439946
निवडणूक

शिक्षकांना बँकेच्या माध्यमातून पेन्शन सुरु करणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिक्षक बँकेत गुरुकुल मंडळाची सत्ता आल्या नंतर जुनी पेन्शन नसलेल्या डी.सी.पी.एस.शिक्षकांना बँकेच्या माध्यमातून पेन्शन सुरु करण्यात येईल असे आश्वासन गुरुकुल मंडळाचे नेते डॉ.संजय कळमकर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“शिक्षक बँकेत जुन्या जाणत्या लोकांनी अमर पेन्शन ठेव योजना सुरु केली होती.त्याचा फायदा अनेक शिक्षकांच्या कुटुंबियांना झाला होता.त्याच धर्तीवर डी.सी.पी.एस.शिक्षक बंधू भगिनींसाठी “मृत्युंजय” पेन्शन योजना आपण सुरु करणार आहोत.त्याचा फायदा जुनी पेन्शन नसणाऱ्या शिक्षकांना होणार आहे”-डॉ.संजय कळमकर,नेते,गुरुकुल मंडळ नगर जिल्हा शिक्षक बँक.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसोबत होणार्‍या विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ७६४ उमेदवारी अर्जाची विक्री झालेली असून १८ विश्वस्त मंडळाच्या जागसाठी मंगळवार अखेर १९९ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.त्यासाठी प्रचाराचा वेग वाढला असून कोपरंगावात कोपरगाव तालुका गुरुकुल मंडळ आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.

सदर प्रसंगी व्यासपीठावर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे,जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे,संजय नळे,गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते,प्रल्हाद साळुंके,संजय महानुभाव,अशोक थोरात,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कार्यकरी सदस्य बाजीराव मोढवे,अशोक कानडे,श्रीराम तांबे,आप्पासाहेब चौधरी,सीताराम गव्हाणे,प्रमोद जगताप,जुनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष वसंत भातकुडव आदी उपस्थित होते.

डॉ.कळमकर पुढे म्हणाले कि,”शिक्षक बँकेत जुन्या जाणत्या लोकांनी अमर पेन्शन ठेव योजना सुरु केली होती.त्याचा फायदा अनेक शिक्षकांच्या कुटुंबियांना झाला होता.त्याच धर्तीवर डी.सी.पी.एस.शिक्षक बंधू भगिनींसाठी “मृत्युंजय” पेन्शन योजना आपण सुरु करणार आहोत.त्याचा फायदा जुनी पेन्शन नसणाऱ्या शिक्षकांना होणार आहे. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे म्हणाले बँकेच्या सत्ताधारी मंडळाने घड्याळ घोटाळा,कर्मचारी प्रमोशन मध्ये लाखोंचा गैरव्यवहार केला आहे.कोरोनाने अनेकांना तोटा झाला असला तरी बँकेचे संचालक व नेत्यांनी या संकटाचे संधीत रुपांतर केले व नेत्यांच्या नातेवाईक कर्मचार्यांना वेतनवाढी दिल्या,दुरुस्तीच्या नावाखाली सभासदांना लाखोंचा भुर्दंड दिला.कोरोना काळात संचार बंदी असतानाही लाखोंचा प्रवास भत्ता लाटला,एका सेवा निवृत्त गुरुजी नेत्याच्या आडमुठेपणामुळे विकास मंडळ या शिक्षकांच्या संस्थेचे बांधकाम अपूर्ण ठेवून शिक्षक सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.या सर्व गोष्टीना सर्वसामान्य शिक्षक सभासद आता कंटाळला आहे त्यामुळे येऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरुकुल मंडळाची सत्ता येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

यावेळी दत्ता गरुड,संजय खरात,कैलास वाघ,सुनिता मोरे,नंदू दिघे,लक्ष्मीकांत वाडीले, लतिफखान पठाण,कैलास साळगट मुबस्शीर खान,वाल्मिक नीलकंठ,श्रीकांत साळवे,आशा इल्हे,मंगल गोपाळे,ज्ञानेश्वर सैंदाणे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुरुकुल मंडळ तालुका अध्यक्ष संजय खरात यांनी केले.तर शेवटी आभार अशोक थोरात यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close