जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील…या सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अमरावती गावातील आंबिका सोसायटीची निवडणूक संजीवनी सजकारी साखर कारखाण्याचे संचालक अरुण येवले यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या बिनविरोध झाली असून उपरावती विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखल्याने सभासदांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.

करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत.त्यानुसार देर्डे-कोऱ्हाळें येथील उमरावती सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती संजीवनी कारखाण्याचे संचालक अरुण येवले यांनी दिली आहे.

करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत.त्यामध्ये साखर कारखाने,पतसंस्था,नागरी सहकारी बँका,सहकारी सूतगिरण्या,सहकारी दुग्ध संस्था,कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा समावेश आहे.प्रलंबित निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी दिले आहेत.त्यानुसार देर्डे-कोऱ्हाळें येथील उमरावती सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

या निवडणुकीत संजीवनी सहकारी कारखाण्याचे संचालक अरुण येवले यांनी अल्पसंख्याक सभासदाना विशेष न्याय दिल्याने अल्पसंख्याक सभासदांनि समाधान वेक्त केले आहे.या निवडणुकीत संचालक म्हणून सर्वसाधारण गट अरुण विठ्ठलराव येवले,देवराम विठ्ठल गवळी,साहेबराव काशिनाथ शिंदे,बाळासाहेब माधवराव होन,ज्ञानेश्वर विष्णुपंत देशमुख,विठ्ठल दिनकर डुबे,पुंडलिक कारभारी गवळी,सोमनाथ बाबुराव गायकवाड,अनुसूचित जाती-जमाती वर्ग -निवृत्ती शंकर विघे,महिला राखीव-विजया दत्तात्रय पवार,रेखा हरिभाऊ कोल्हे,इतर मागासवर्गीय-चांगदेव कचेश्वर कोल्हे,भटक्या विमुक्त जाती-दिगंबर भानुदास बैरागी आदी संचालकांची बिनविरोध निवड झाली या वेळी सोसायटीचे सर्व वरिष्ठ सभासद व भाजप गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी आर.एन.रहाणे यांनी काम पाहिले आहे.त्यांना सचिव अशोक घेर यांनी सहाय्य केले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार,संजीवनी साखर कारखाण्याचे संचालक अरुण येवले,देवराम गवळी आदींसह सभासदांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close