जाहिरात-9423439946
निवडणूक

वेस सोसायटी निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथीनंतर आता प्रलंबित निवडणूक घेण्याकडे सहकार विभागाचा कल असून या निवडणुकीत अनेक सहकारी संस्था बिनविरोध झाल्या असल्या तरी कोपरगाव तालुक्यातील वेस सहकारी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूक वेगळ्याच कारणाने चर्चेत आली असून या सेवा संस्थेच्या निवडणुकीत प्रस्थापित काळे-कोल्हे या दोन गटांना एकत्र येण्याची नामुष्की पत्करावी लागली असून त्यांना स्थानिक,”अपक्ष परिवर्तन पॅनल”च्या गटाने जेरीस आणल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे.

वेस सोसायटी निवडणुकीत हि निवडणूक मात्र दोन्ही गटांनी बिंनविरोध करण्याचा चंग बांधला होता.त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी छेद दिला आहे.त्यांनी काळे-कोल्हे हे आपापसात जागा वाटून हि या संचालक पदाची निवडणूक घेण्याचा डाव उधळून लावला आहे.व तब्बल आठ जागा दिल्या आहेत.त्यांनी “अपक्ष परिवर्तन पॅनल” हे वेगळे नाव धरण करून हा लढा सुरु केला आहे.त्याला सभासदांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती या पॅनलचे प्रमुख कार्यकर्ते आप्पासाहेब कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधींशी दिली आहे.त्यांचे चिन्ह “शिट्टी” आहे.

औरंगाबाद खंडपीठाने मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक बाजार समितीच्या निवडणुकीआधी घेण्याचे आदेश दिले होते.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी राज्यात पात्र असणार्‍या सर्व सेवा सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिलेले आहेत.आदेशानूसार सहकार विभागाने ०१ डिसेंबरपासून सहकारी संंस्थांच्या निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता.२६ नोव्हेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांची प्रारूप मतदार यादी ०१ नोव्हेंबर २०२१ च्या अर्हता दिनांकावर तयार करण्याचे आदेश होते.तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या मुदत संपणार्‍या संस्थांची प्रारूप मतदार याद्या संबंधीत संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या दिनांकावर तयार कराव्यात असे आदेशात नमुद करण्यात आले होते.त्यानुसार संगमनेर-९५,राहाता-६२, कर्जत-६३,पाथर्डी-७६,जामखेड-४६,राहुरी-८९,शेवगाव-५६,श्रीरामपूर ५६,श्रीगोंदा-१२४,पारनेर-९४,नेवासा-११९,नगर-८३,अकोले-७२,आणि कोपरगाव-९३ अशी तालुका निहाय निवडणूक होणार्‍या सोसायट्यांची संख्या असून त्यांची निवडणूक संपन्न होत आहे.त्यानुसार या सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा वेग अंतिम टप्यात असून त्या संपन्न होत आहे.

कोपरगाव तालुक्यात प्रस्थापित आ.आशुतोष काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे पारंपरिक गट प्रबळ आहेत.त्यांच्यात हि लढत होत असते.तालुक्यात ज्या ठिकाणी हे पारंपरिक गट आमने-सामने आहे त्या बऱ्याच ठिकाणी सहकारी सेवा संस्था बिनविरोध निवड झाल्या आहे.मात्र कोपरगाव तालुक्यात वेस येथे “अपक्ष परिवर्तन पॅनल” आणि जवळके येथे,”शेतकरी विकास मंडळ” आदींनी या दोन्ही ठिकाणी अपक्ष गटांनी निवडून हातात घेतली असून त्याचा फटका प्रस्थापित नेत्याना बसण्याचा मोठा धोका वर्तविण्यात येत आहे.
त्यातले त्यात वेस सोसायटी निवडणुकीत हि निवडणूक मात्र दोन्ही गटांनी बिंनविरोध करण्याचा चंग बांधला होता.त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी छेद दिला आहे.त्यांनी काळे-कोल्हे हे आपापसात जागा वाटून हि या संचालक पदाची निवडणूक घेण्याचा डाव उधळून लावला आहे.व तब्बल नऊ जागा दिल्या आहेत.त्यांनी “अपक्ष परिवर्तन पॅनल” हे वेगळे नाव धरण करून हा लढा सुरु केला आहे.त्याला सभासदांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती या पॅनलचे प्रमुख कार्यकर्ते आप्पासाहेब कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधींशी दिली आहे.त्यांचे चिन्ह “शिट्टी” आहे. या ठिकाणी पारंपरिक विरोधक काळे-कोल्हे यांना एकत्र येण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे.त्यामुळे तालुक्यात या बहुचर्चित निवडणुकीची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

या पॅनल मध्ये माजी सरपंच माणिक दिघे,आप्पासाहेब कोल्हे,ज्ञानेश्वर कोल्हे,दत्तात्रय कोल्हे,प्रभाकर गोसावी,आनंद भडांगे,साईनाथ कोल्हे,लालबाबा सय्यद,शिवाजी गायकवाड,प्रवीण कोल्हे,सुनील गायकवाड,दत्तात्रय गोर्डे,रावसाहेब भडांगे,सोयगाव सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक चांगदेव कुऱ्हाडे,संजय बर्डे आदींचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close