जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव पालिका निवडणुकीचा शिमगा होणार सुरु!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यातील २०८ नगरपालिकांतील सदस्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ पर्यंत संपत आहे.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या नगरपालिकांचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे.त्यात कोपरगाव नगरपरिषदेचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता राजकीय शिमग्यास लवकरच प्रारंभ होणार आहे.त्या दृष्टीने राजकीय पातळीवर हालचाल दिसू लागली असून कोपरगावची हद्दवाढ झाल्याने त्यात दोन जागांची भर पडून ती २८ वरून आता ३० वर गेली आहे.

गत कोपरगाव नगरपरिषदेत नोव्हेंबर २०१६ साली राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना निवडणुकीत नगराध्यक्ष पदी जनतेतून मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष पदी अपक्ष उमेदवार विजय वहाडणे हे १८ हजार ५०० पेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते.तर २८ जागांपैकी कोल्हे गटास १२ तर शिवसेनेस ०८ अशा युतीस २० जागा मिळाल्या होत्या तर आ. काळे गटास ०७ तर ०१ अपक्ष नगरसेवक निवडून आला होता आता आगामी काळात राजकीय काय चित्र असेल हे यथावकाश सिद्ध होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षणासंदर्भातील अहवाल नुकताच फेटाळल्यानंतर आता राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.सर्वोच्च न्यायलयाचा निकाल येताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.त्यातून महाआघाडी व भाजपा नेत्यांचा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे.त्यामुळे या निवडणूका आगामी काळात पुढे ढकलल्या जाणार आहेत की लागलीच होणार हे उघड आहे.त्यामुळे यात कोण कोणाला दंडाच्या बेडकुळ्या दाखवणार की एकमेकांशी हातमिळवणी करणार हे लवकरच उघड होणार आहे.

नगर जिल्ह्यातील चार नगरपंचायती व नऊ नगर पालिकांची मुदत संपत आली होती.त्यातील चार नगर पंचायतींची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असली तरी तिचे रूपांतर नगरपरिषदेत झाले आहे.त्यामुळे शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद झाली असल्याने त्यांची निवडणूक लवकरच संपन्न होणार आहे.अशा स्थितीत आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे.

या नऊ पालिकांत कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर,जामखेड,शेवगाव,पाथर्डी,राहाता,राहुरी व देवळाली प्रवरा आदींचा समावेश आहे.यातील कोपरगाव,पाथर्डी,राहाता व देवळाली प्रवरा या चार नगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे.तर उर्वरित नगरपालिकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे.संगमनेर नगरपालिका काँग्रेसच्या,श्रीरामपूर,जामखेड,शेवगाव व राहुरी या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये संपन्न झाली होती.त्यावेळी नगराध्यक्ष पद भाजपाने जनतेतून निवडले होते.त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले होते.तर सव्वादोन वर्षांपूर्वी राज्यात महाआघाडी सरकार सत्तेत आल्याने व त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी असल्याने त्यांचा प्रभाग रचनेच्या निवडणुकांवर विश्वास असल्याने या वेळच्या निवडणूका या या छोट्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहे.त्यामुळे आता राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते हे कामाला लागले आहे.आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकर्त्याना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.या शिवाय सर्वच पक्षांनी (माजी नगराध्यक्ष वहाडणे व झावरे गट सोडून) तरुणांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी क्रिकेटच्या स्पर्धां आयोजनाला ऊत आणला आहे.कोपरगाव शहरात सगळीकडे बँनरबाजीला व युवा नेत्यांच्या छब्यांना ऊत आला आहे.बॅनरवर अन्य कार्यकर्त्यांच्या छायाचित्रास जागा उरलेल्या नाहीत.केवळ आणि केवळ मुंडक्यांच्या माळा जिकडेतिकडे दिसत आहेत.

गत कोपरगाव नगरपरिषदेत नोव्हेंबर २०१६ साली राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना निवडणुकीत नगराध्यक्ष पदी जनतेतून मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष पदी अपक्ष उमेदवार विजय वहाडणे हे १८ हजार ५०० पेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते.तर २८ जागांपैकी कोल्हे गटास १२ तर शिवसेनेस ०८ अशा युतीस २० जागा मिळाल्या होत्या तर आ. काळे गटास ०७ तर ०१ अपक्ष नगरसेवक निवडून आला होता आता आगामी काळात राजकीय काय चित्र असेल हे यथावकाश सिद्ध होणार आहे.

कोपरगाव नगर परिषदेत प्रस्थापित आ.काळे व माजी मंत्री कोल्हे यांचे प्रबळ गट असले तरी त्यात आता शिवसेना दोन्ही ठिकाणी विभागली गेली आहे.तर भाजप गट वहाडणे आता स्वतंत्र अस्तित्व दाखवणार का की सेनेचे व काळे-कोल्हेचें मोठ्या संख्येने नाराज असलेले कार्यकर्ते यांना एकत्र आणणार हे लवकरच समजणार आहे.कोपरगावात व्यापारी महासंघाच्या माध्यमातून प्रबळ असलेले राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे हे स्वतंत्र बाणा दाखवणार का हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.तर राहाता तालुक्यात व शिर्डी आदी ठिकाणी आ.काळेंचा उपद्रव वाढल्याने गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे प्रवराचा आदेश मानणार का ? की वहाडणे,कोयटे शिवसेना यांचेशी जागावाटप करणार हे लवकरच कळणार आहे.की नेहमीप्रमाणे काळे-कोल्हेच्या कच्छपी लागणार हे यथावकाश कळणार आहे.सेनेत वर्तमान काळात मोठी धुसफूस आहे.दोन गट आमनेसामने येत आहे.याचे कारण,”असंगाशी संग” हे असून बऱ्याच जणांना हे उशिरा समजले आहे.दरम्यान हि निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असून नगराध्यक्ष पद नगरसेवकांमधून निवडले जाणार असल्याने संघटनेचा व नेतृत्वाचा अभाव असणाऱ्या अनेकांना प्रस्थापित काळे-कोल्हे हे नेतेच आर्थिक कारणाने सोयीचे वाटतं आहे.

दरम्यान प्रभाग रचना कार्यक्रम ०२ मार्च पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक यांच्याकडे सादर करण्यात आल्या आहेत.०७ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे.१० मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी न हरकती तसेच सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तर १० ते १७ मार्च या कालावधीत हरकती मागविण्यात येतील.२२ मार्चला हरकतींवर सुनावणी होणार आहे.तर २५ मार्च पर्यंत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.०१ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close