जाहिरात-9423439946
निवडणूक

राळेगण सिद्धीनंतर कोपरगाव तालुक्यातही साड्या-लुगड्यांचे वाटप !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यात आज ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत असताना शेवटच्या रात्री समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगण सिद्धी नंतर कोपरगाव तालुक्यातही साड्या-लुगड्यांचे व मतदारांना पाचशे रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत वाटप झाल्याची विश्वसनीय माहिती हाती आल्याने लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून पडल्याचे मानले जात आहे.या घटनेने लोकशाहीप्रेमी नागरिकांनी निषेध व्यक्त केला असून या नेत्यांचा व दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आज दुपारपर्यंत संवत्सरचा अपवाद वगळता कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.संवत्सर येथे एका माजी लष्करी जवान थेट निवडणूक प्रांगणात गाडीसह प्रवेश केल्याची वार्ता असून त्याबाबत पोलिसांनी त्यास हटकूनही त्याने त्यांना जुमानले नाही परिणामी तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्यास लाठीचा प्रसाद दिल्याचे वृत्त हाती आले आहे

राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचाराच्या तोफा दोन दिवसापूर्वी सांगता सभांनी थंडावल्या असून आज मतदान संपन्न होत आहे त्यासाठी पोलिसानी चोख बंदोबस्त केलेला आहे.मात्र निवडणुकीची आदली रात्र हि कत्तल की रात्र मानली जात असून या रात्रीच निवडणुकीचा निकाल लोकशाहीचे खुनी व दलाल हे आपल्या थैल्या दलालामार्फत मोकळ्या सोडून अवैध दारूचा भडिमार केला जातो व तरुणांना बहकावले जात असते याचा दाहक अनुभव देशात नावाजलेले गाव व आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राळेगण सिद्धीतही नुकताच मिळाला असून चारचाकी वाहनातून मतदारांना भुलविण्यासाठी थेट साड्या-लुगड्यांचे वाटप करताना पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले आहे.तशाच घटना कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घडल्या आहेत.शेवटच्या आठवड्यात तरुणांना दारू,मटण,हॉटेलवर ओल्या पार्ट्या यांचा महापूर आला होता.व शेवटच्या रात्री तर कहर झाला असून प्रति मतदान पाचशे रुपयांचा खुर्दा झाला आहे.तर छोट्या ग्रामपंचायतीत तीनशे रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.विशेषतः दोन्ही साखर सम्राटांनी संवत्सर ग्रामपंचायतीत पाचशे रुपये वाटप झाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून तिसरा गटही मागे नाही.त्या साठी कार्यकर्ते (यांना कार्यकर्ते म्हणण्याऐवजी दलाल म्हणणे योग्य) रात्रभर जागेच होते.विशेषता या वाटपासाठी आता या दलालांवरही या नेत्यांचा भरोसा राहिलेला नाही त्यासाठी आता थेट साखर कामगारांना या कर्तव्यावर नेमले जाते.निवडणुकीतही कार्यकर्त्यांवर या नेत्यांचा भरोसा नाही त्यामुळे त्यांना उमेदवाऱ्या देण्याऐवजी कामगारांना पुढे करण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.हे या कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटलेले नाही त्यामुळे आता हे कार्यकर्तेही आपली हात की सफाई या नेत्यांना दाखवताना दिसत आहे.त्यातून कार्यकर्त्यांना केवळ चहा,पाणी व ओल्या पार्ट्यांचा खुराक तेवढा वाट्याला येत आहे.व तेवढ्यासाठी हि मंडळी या नेत्यांचे तळवे चाटत असल्याचे दिसून येत आहे.

आज दुपारपर्यंत संवत्सरचा अपवाद वगळता कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.संवत्सर येथे एका माजी लष्करी जवान थेट निवडणूक प्रांगणात गाडीसह प्रवेश केल्याची वार्ता असून त्याबाबत पोलिसांनी त्यास हटकूनही त्याने त्यांना जुमानले नाही परिणामी तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्यास लाठीचा प्रसाद दिल्याचे वृत्त हाती आले आहे.तेथे पूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात असलेले मात्र आता नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कर्तव्यावर आल्याने अनेकांनी त्यांचा धसका घेतला असून आदल्या रात्रीच शहरात त्यांना अनेकांनी पाहिल्याने धूम ठोकल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.दरम्यान आज दुपारपर्यंत तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीस ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची व शांततेत मतदान सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.तर शहर हद्दीतील नऊ ग्रामपंचायत हद्दीतही तोच प्रकार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दुपारी सव्वा तिनच्या सुमारास दिली आहे.

दरम्यान कोपरगाव निवडणूक अधिकाऱ्यानी तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर २१ बस,०८ जीप,एकूण २९ गाड्या रवाना केल्या आहेत तर एकूण ६५० कर्मचारी नियुक्त केले आहे.त्यात निवडणूक केंद्रावर ५५५ तर राखीव ९५.तर मतदान केंद्रावर एकूण १११ पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहे.या शिवाय विभागीय पोलीस ०६ नियुक्त केले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी उशिरा दिली आहे.परिस्थितीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे नियंत्रण ठेऊन आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close