जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवू नका-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील धारणगाव प्रभाग क्र. ६ मधील धारणगाव रोड ते मुंदडा घर रस्ता व टिळकनगर मधील शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याचा निधी माजी आ. कोल्हेंच्या दबावातून दुसरीकडे वळवून या रस्त्याचे काम थांबवू नका अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्यासह कार्यकर्त्यानी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे केली आहे.

“कोपरगाव शहर विकासात माजी आ.कोल्हेंकडून राजकारण केले जात असून सदरच्या रस्त्यांचा निधी दुसरीकडे वळविण्याचे कटकारस्थान सुरु असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देवून या रस्त्यांचा निधी दुसरीकडे न वळवता या रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे”-संदीप वर्पे-कार्याध्यक्ष,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.

मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वर्पे यांनी पूढे म्हटले आहे की,”प्रभाग क्र. ६ मधील धारणगाव रोड ते मुंदडा घर रस्ता व टिळकनगर मधील शनी मंदिर ते धारणगाव रोड रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.त्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी सदरच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने सदरच्या रस्त्यांसाठी तांत्रिक मंजुरी मिळविली आहे.परंतु शहर विकासात माजी आ.कोल्हेंकडून राजकारण केले जात असून सदरच्या रस्त्यांचा निधी दुसरीकडे वळविण्याचे कटकारस्थान सुरु असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देवून या रस्त्यांचा निधी दुसरीकडे न वळवता या रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी वर्पेसंह कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मंदार पहाडे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, प्रकाश दुशिंग,आकाश डागा,विजय दाभाडे,दिनेश संत,विजय नागरे,संजय कट्टे,प्रवीण शेलार,सुनील वैरागळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close