जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात…यांचेकडून इको फ्रेंडली गणेश मुर्ती कार्यशाळा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

ब्राह्यण सभा कोपरगांवच्या विदयमाने पर्यावरण पुरक इको फ्रेंडली शाडु मातीचे गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या उपक्रमामध्ये कोपरगांवातुन विविध शाळेतील ५८ विद्यार्थी व व्यक्तींनी सहभाग घेतला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस च्या तुलनेत मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही. तसेच इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात.तसेच इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे व प्राकृतिक असतात.ह्यामुळे कोणतीही हानी पोहचत नाही.त्यामुळे अशा मूर्तीबाबत जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन कोपरगावात करण्यात आले होते त्या ला लक्षवेधी प्रतिसाद मिळाला आहे.

या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी विदयार्थींना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी ते म्हणाले की गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली शाडु माती गणेश मुर्ती तयार करणे पर्यावरण पुरक आहे.कारण त्यामुळे पर्यावरणाचा -हास थांबतो.त्यामुळे कार्यशाळेचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक आहे.

या कार्यशाळेला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे कला शिक्षक अतुल कोताडे व लायन्स मुक बधिर विदयालयाचे कला शिक्षक रविंद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी यावेळी चांगल्या गणेश मुर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे सहसचिव व प्रकल्प प्रमुख संदीप देशपांडे,युवा आघाडीचे चि.अथर्व चिकटे,कु.अबोली जोशी,कु.प्राजक्ता जोशी,कु.आर्या महाजन,चि.सोहम को-हाळकर आदीनी विशेष परिश्रम घेतले.ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,खजिनदार जयेश बडवे,सह खजिनदार योगेश कुलकर्णी,सदस्य संजीव देशपांडे,वसंतराव ठोंबरे,मिलिंद धारणगांवकर आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close