जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहराचा पाणी प्रश्न सुटल्याने अनेकांना पोटदुखी-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराची तहान भागवण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी १३१.२४ कोटी निधी आणल्यामुळे प्रत्यक्षात ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाले असताना विरोधकांची पोटदुखी वाढली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांच्या विरुद्ध दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

“गत विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे मताधिक्य घटले व हवेत असलेल्या विरोधकांचा पराभव झाला.५ नं. साठवण तलावाचे काम सुरू झाल्यामुळे हे मताधिक्य अजून घटनार आहे. त्यामुळे ५ नं. साठवण तलाव होवू नये यासाठी कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या नावाने न्यायालयात विविध याचिका दाखल केल्या.साठवण तलावाचे काम घेणाऱ्या कंपनीला काम करू नये यासाठी दबाव आणला.सिंचनाचे पाणी कमी होणार अशी आवई उठवली त्यांना वर्तमानात कोणतेही काम नसल्याने विरोधक हे उद्योग करत आहे”-सुनील गंगूले,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी.

प्रसिद्धी पत्रकात गंगुले यांनी पुढे असे म्हटले आहे की, २०१९ पासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आवर्तन दिले जात आहे त्याबाबत आजतागायत एकाही लाभधारक शेतकऱ्याची तक्रार नाही.याउलट २०१४ ते २०१९ या पाच वर्षात माजी आमदारांनी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला नेल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडता येत नव्हत्या. २०१९ पासून कालवा सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रात होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व सूचना मांडत होते. त्या अडचणी व सूचनांचा योग्य विचार होऊन शेतकऱ्यांना आज पर्यंत न्याय दिला गेला आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात अडीच किलोमीटरच्या पुढे आवर्तनाचे पाणी दिले गेले नाही काही ठिकाणी तर अडीच किलोमीटरच्या आतच ते थांबले त्याबाबत देखील विरोधकांनी बोलले पाहिजे.आ.काळे यांनी सत्ता नसताना देखील ५ नं. साठवण तलावाची आग्रही भूमिका लावून धरली व प्रत्यक्षात पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी आणून प्रत्यक्षात या योजनेचे काम सुरु केले आहे.

रविवार पासून कोपरगाव शहरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी मिळणार आहे.लवकरच ५ नं. साठवण तलावाचे काम पूर्ण होऊन सर्व शहरवासीयांना नियमितपणे मुबलक पाणी मिळणार आहे याची खरी धास्ती विरोधकांनी घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५ नं. साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी आ. काळे यांनी केलेल्या आंदोलनात कोपरगावची जनता त्यांच्या सोबत होती. २०१९ च्या निवडणुकीत देखील त्यांच्या मागे उभी राहिली पर्यायाने विरोधकांचे मताधिक्य घटले व हवेत असलेल्या विरोधकांचा पराभव झाला.५ नं. साठवण तलावाचे काम सुरू झाल्यामुळे हे मताधिक्य अजून घटनार आहे. त्यामुळे ५ नं. साठवण तलाव होवू नये यासाठी कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या नावाने न्यायालयात विविध याचिका दाखल केल्या.साठवण तलावाचे काम घेणाऱ्या कंपनीला काम करू नये यासाठी दबाव आणला.सिंचनाचे पाणी कमी होणार अशी आवई उठवली.मात्र आ. काळे यांनी शेतीचे पाणी कुठेही कमी होवू न देता कोपरगाव शहरासाठी अतिरिक्त ३.३२ द.ल.घ.मी. पाणी मंजूर करून घेतले आहे.त्यामुळे विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत.त्यामुळे त्यांनी कितीही आरोप केले तरी त्यांच्या आरोपांना जनताच उत्तर देणार आहे. आ.काळे हे कधीही टीका करीत नाही व टिकेला उत्तर देत नाही.जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासाचे प्रश्न सोडविणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे.त्यामुळे जनता त्यांच्यासोबत आहे.मात्र मागील अडीच वर्षापासून ज्यांना काही काम नाही ते मात्र फक्त टीका करायचे काम करीत असल्याचा टोला सुनील गंगुले यांनी साहेबराव रोहोम यांना शेवटी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close