जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कर्मवीरनगर परिसरात नागरिकांना पाणीपट्टी दुप्पट आकारली,नागरिकांत संताप!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नुकताच समावेश झालेल्या कर्मवीर नगरच्या पाणी पट्ट्या दुप्पट आकारत आल्याने तेथील नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेवर नाराजी व्यक्त करून पाणी पट्टी इतर नागरिकांसारखी पूर्ववत करावी अशी मागणी जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी एका निवेदनाद्वारे केली कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे.

नव्याने कोपरगाव पालिकेत समाविष्ठ झालेल्या उपनगरांना आपली पाणी पट्टी व इतर पट्ट्या इतर नागरिकांप्रमाणे आकारल्या जातील हि रास्त अपेक्षा होती.मात्र तिला नुकताच कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने छेद दिला आहे.या भागातील नागरिकांना डबल आकारणी करून पाणी पट्टी ३ हजार ४०० रुपयांप्रमाणे आकारणी केली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ व नाकरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर,ओमनगर,शंकरनगर आदि उपनगरांचा नुकताच कोपरगाव शहर हद्दीत समावेश झाला होता.त्या आधी हि उपनगरे शहर हद्दीच्या बाहेर होती.त्यामुळे त्यांची पाणीपट्टी दुप्पट आकारली जात होती.मात्र या भागातील नागरिकांनी वारंवार मागणी करून हि उपनगरे सरकारने शहर हद्दीत समाविष्ट केली होती.त्यामुळे आपली पाणी पट्टी व इतर पट्ट्या इतर नागरिकां प्रमाणे आकारल्या जातील हि रास्त अपेक्षा या नागरिकांची होती.मात्र तिला नुकताच कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने छेद दिला आहे.या भागातील नागरिकांना डबल आकारणी करून पाणी पट्टी ३ हजार ४०० रुपयांप्रमाणे आकारणी केली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे या नाकरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपण नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना हा उद्योग का केला ? असा सवाल उमेश धुमाळ यांनी केला आहे.त्यासाठी त्यांनी छायांकित पाणी पट्टीची प्रत निवेदनासोबत जोडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close