जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

शेततळ्यातील शेवाळामुळे शेती उत्पादनात घट-…या किटक तज्ज्ञांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेवाळ हे हरितद्रव्य असणारी वनस्पती पाण्यावर वाढत असतानाच त्यावर उपजीविका करणारे जिवाणू हे देखील तिथे वाढू लागतात.त्यामुळे पाणी प्रदूषित होते ते पिण्यास योग्य राहत नाही त्याच बरोबर शेतीत देखील वापरण्यास योग्य राहत नाही.असे प्रदूषित पाणी शेतीला वारंवार शेतकरी देत असतील तर उत्पादन हे घटते असे प्रतिपादन प्रसिद्ध किटकतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी नुकतेच केले आहे.

“शेवाळ पाण्याचे प्रदूषण करतेच परंतु पाण्यामध्ये विषारी जीवाणू वाढवून मनुष्यप्राणी आणि पर्यावरण यांच्यामध्ये रोग पसरविण्याचे काम करते.शेवाळाच्या वाढीमूळे पाण्याचा सीओडी आणि बीओडी वाढतो त्यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो असे पाणी भाजीपाला,फळ वर्गीय पिके आणि ऊस पिके यांना दिल्यास पिक वाढीस मंदावते आणि उत्पादनात मोठी घट त्यामुळे होते”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,प्रसिद्ध किटकतज्ञ कोपरगाव.

शेवाळ वाढीचा काळ-

शेवाळ पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी वनस्पती-जिथं क्षारांचे प्रमाण जास्त,जमीन क्षारयुक्त आणि क्षारांचा जमिनीत जास्त निचरा ज्या भागात होतो अशा ठिकाणी पाणी क्षारयुक्त होते व त्यावर शेवाळ वाढते.क्षार युक्त पाणी,स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोठा दिवस व रात्र लहान अशा परिस्थितीमध्ये शेवाळ हे झपाट्याने वाढते आणि पाण्याचे प्रदूषण करत असते.साधारणता मार्च महिन्यानंतर सूर्यप्रकाश स्वच्छ आणि भरपूर असतो तो शेवाळवाढीस पूरक ठरतो तसेच जुलै महिन्यापर्यंत ही परिस्थिती अशीच राहते आणि त्यामुळे शेवाळ हे पाणी साठ्यातील महत्वाचे तन आणि शेतकऱ्यांचे धन खाणारे तन असेच म्हणावे लागेल.

शेवाळ वाढीमुळे होणारे नुकसान-

शेवाळ पाण्याचे प्रदूषण करतेच परंतु पाण्यामध्ये विषारी जीवाणू वाढवून मनुष्यप्राणी आणि पर्यावरण यांच्यामध्ये रोग पसरविण्याचे काम करते.शेवाळाच्या वाढीमूळे पाण्याचा सीओडी आणि बीओडी वाढतो त्यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो असे पाणी भाजीपाला,फळ वर्गीय पिके आणि ऊस पिके यांना दिल्यास पिक वाढीस मंदावते आणि उत्पादनात मोठी घट त्यामुळे होते.अनेक प्रकारच्या हानीकारक बॅक्टेरिया यांचा शेवाळाच्या माध्यमातून आणि शेवाळ ग्रस्त पाण्यामुळे शेतीत शिरकाव होतो.त्यामुळे शेतीतील मित्र जिवाणू यांची संख्या कमी होत जाते आणि त्यांची जागा हानीकारक जिवाणू घेऊन नत्र,स्फुरद ,पालाश खतांची साखळी विस्कळीत करते व ही खते त्यामुळे पिकास उपलब्ध होत नाहीत.आणि म्हणूनच पिके कुपोषित होतात व अन्नद्रव्यांचे कमतरता दर्शवितात.त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असते.अगदीच हानिकारक जिवाणूंची पातळी ओलांडली गेल्यास पाण्यातील मासे देखील त्यामुळे मरतात आणि शेतकऱ्यांना त्यामुळे मोठी आर्थिक हानी होते.

“शेवाळ ही पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे तसेच याचे नियंत्रण करणाऱ्या व पर्यावरणास सुरक्षित असे मित्र जीवाणू देखील पर्यावरणात आहेत.एरवी कमी प्रमाणात शेवाळ जेव्हा असते तेव्हा हे जिवाणू त्याला वाढू देत नाहीत.परंतु,शेवाळवाढीस खतपाणी मिळाल्याने क्षार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याची वाढ जोमाने होत चालली आहे”

शेवाळ नियंत्रण व उपाय-

अनेक प्रकारचे रसायन यापूर्वी शेवाळ नियंत्रणामध्ये वापरले जात असत त्यामध्ये कॉपरचा वापर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होत असायचा परंतु कॉपर हे खनिज पाण्यात वाढल्यामुळे पिण्यास आणि इतर प्राण्यांना तसेच पर्यावरणाला त्याचा धोका पोहोचू लागला त्यामुळे त्याचा वापर देखील तिथं कमी झाला.शेवाळ ही पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे तसेच याचे नियंत्रण करणाऱ्या व पर्यावरणास सुरक्षित असे मित्र जीवाणू देखील पर्यावरणात आहेत.एरवी कमी प्रमाणात शेवाळ जेव्हा असते तेव्हा हे जिवाणू त्याला वाढू देत नाहीत.परंतु,शेवाळवाढीस खतपाणी मिळाल्याने क्षार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याची वाढ जोमाने होत चालली आहे आणि म्हणून शेवाळ नियंत्रणासाठी शेवाळ खाणारे व शेवाळाचे अन्नद्रव्य विघटन करणारे जिवाणू अश्वमेध विकसित केले असून त्याचा २०१५ पासून हजारो शेतकरी शेतीतील शेवाळ,शेततळ्यातील शेवाळ, विहिरीतील शेवाळ निर्मूलनासाठी उपयोग करत आहेत.शेवाळ निर्मूलनासाठी फायदा त्यांना होत आहे.येणाऱ्या काळात पाणी हे भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणात कमी होणार असून उपलब्ध पाणी शेतीच्या वापरात कसे आणता येईल यावर संशोधन सुरू असून त्याचाच एक भाग हा अश्वमेध संशोधनाचा मुद्दा आहे.

अश्वमेध संशोधन नेहमी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना पूरक असे नवनवे संशोधन देत असून शेवाळ निर्मूलनासाठी अश्वमेध इकोफ्रेश हे उत्पादन शेतकऱ्यांनी शेवाळ निर्मुलनासाठी वापरावे असे आवाहन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close