जाहिरात-9423439946
ऊर्जा विभाग

वीज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महावितरणने वीज नियामक मंडळाकडे वीज दरवाढी बाबत अन्यायकारक प्रस्ताव दाखल केलेला असून सदर प्रस्ताव मंजूर झाला सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडणार आहे.त्यामुळे ही संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदविण्याचे आवाहन करून कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

“आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर किमान ७३ डॉलर प्ररी बॅरलवर येऊनही पेट्रोल,डिझेल त्याचबरोबर घरगुती गॅसचे व जीवनावश्यक वस्तूंची किंमत सरकारने कमी केलेली नाही हे विशेष ! त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती अंदाजपत्रक कोलमडले आहे.दुसरीकडे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांच्या शेती मालाला मात्र अपेक्षित भाव मिळत नाही त्यामुळे अशा स्थितीत जर वीज दरवाढ झाली तर ती कंबरडे मोडणारी ठरणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

राज्यात जवळपास १५०० कोटी रुपयांचा तोट सहन करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे.त्या नुसार आगामी वीजदर आढाव्यात तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे.तर, सन २०२४-२५मध्ये आणखी १५ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे.या प्रस्तावामुळे घरगुती,व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.याबाबत नुकतीच कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांची कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या आवारात बैठक घेऊन जनजागृती केली आहे त्यात हे आवाहन केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे संचालक,माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,माजी नगसेवक,मतदार संघातील शेतकरी,व्यापारी, कारखानदार व घरगुती वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्यास वीज ग्राहकांना मोठा भुर्दंड पडणार आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर किमान ७३ डॉलर प्ररी बॅरलवर येऊनही पेट्रोल,डिझेल त्याचबरोबर घरगुती गॅसचे व जीवनावश्यक वस्तूंची किंमत सरकारने कमी केलेली नाही हे विशेष ! त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती अंदाजपत्रक कोलमडले आहे.दुसरीकडे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांच्या शेती मालाला मात्र अपेक्षित भाव मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत जर वीज दरवाढ झाली तर शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिक व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत.

अशा परिस्थितीत संभाव्य वीज दरवाढीला हरकत नोंदविणे क्रमप्राप्त ठरणार आहे.याबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.अजित पवार यांच्याशी चर्चा करून मतदार संघातील जनतेला सोबत घेवून संभाव्य वीज दरवाढी विरोधात
https://merc.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाइन,ऑफलाईन,पद्धतीने १५ फेब्रुवारी पर्यंत नोंदवाव्या असे आवाहन करून या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणण्यास शेतकऱ्यांनी मदत करावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close