जाहिरात-9423439946
आंदोलन

शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करा,अन्यथा आंदोलन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावसह राज्यात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम मोठ्या उत्साहात सुरु झाला असून या साठी विद्युत पंपासाठी महावितरण कंपनीची मात्र रात्री आज पूरवठा करत असून हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याने या विरोधात कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रणशिंग फुंकले असून शनिवार दि.२ डिसेंबर रोजी एक दिवसीय ‘लाक्षणिक उपोषण’ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

“सदर आंदोलन शुक्रवार दि.२ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.सदर उपोषण हे लाक्षणिक असून ते कोपरगाव येथील महावितरण कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करणार आहे.तरी कोपरगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सामिल व्हावे व आपला सहभाग नोंदवावा”-तुषार विध्वंस,कार्यकर्ते,कोपरगाव.

अ,नगर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात आहे.शेती जगवण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी देत आहेत.एकीकडं राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे.शरीर गोठवणारी थंडी पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.तर दुसरीकडं सरपटणाऱ्या व वन्य प्राण्यांचा धोका आहे.अशा स्थितीत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री जंगली श्वापदापासून संरक्षणासाठी शेतात पहारा द्यावा लागत आहे.याबाबत सत्तेत येणारे राजकारणी कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.विरोधात असल्यावर आकंठ ओरडून शेतकऱ्याचा समस्या मांडताना दिसणारे राजकारणी सत्तेची ऊब मिळताच शेतकऱ्यांच्या मांगण्याना कोलदांडा घालताना दिसत आहेत.त्यामुळे आता शेतकरी सजग होत असून त्या विरोधात त्यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.या विरोधात रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटना आधीच आवाज उठवत असून त्यालाही सरकारने दाद दिलेली नसताना आज कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रण पेटविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातुन कुंभकर्णी सरकारला जागे करण्याचा हा पवित्रा असल्याचे मानले जात आहे.

त्यांनी महावितरण कंपनीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”सर्व शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा ३ फेज वीज पुरवठा करण्यात यावा,शेती पंपासाठी ३ फेज वीज पुरवठा हा पूर्ण दाबाने करण्यात यावा,मौजे ब्राम्हणगाव येथील मंजूर विद्युत उपकेंद्रांचे काम १५ डिसेंबर २०२२ पूर्वी करण्यात यावे,कोपरगाव तालुक्यातील सर्व वीज उपकेंद्रावरील नवीन रोहित्र उच्चदाब क्षमतेचे त्वरित बसवून ते कार्यान्वित करावे,जून २०२१ ते ऑक्टोबर २०२१ तसेच जुन २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंतची अतिवृष्टीमुळे पंप बंद राहिल्यामुळे शेती पंपाची वीज बिल माफ करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

सदर निवेदनावर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा (तिरोडा) संपर्क प्रमुख प्रविण आप्पासाहेब शिंदे,मनसेचे उप-जिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल,कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन मनोहर शिंदे,सामाजिक कार्यकर्ते तुषार चारुचंद्र विद्वांस तसेच कोपरगाव तालुक्यातील आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close