जाहिरात-9423439946
अर्थकारण

ऍड.अजित काळे यांच्या उपस्थितीत शेतकरी समस्येवर जिल्हा बँकेची बैठक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.’नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या पिक कर्जा बाबदच्या मागणी संदर्भात दि.५ ऑगष्ट रोजी जिल्हा बँक व्यवस्थापन समिती यांच्या समवेत अ. नगर जिल्हा शेतकरी संघटनेची बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली आहे.

“शेतकरी शेतात उत्पन्न काढून विविध पिके पिकवूनही त्याच्या पदरात काही पडत नाही.जादा पिकले तर शेतमालाचे भाव पडतात,नाही पिकले तर दुष्काळाचा सामना करावा लागतो.आशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही बँका आपले व्याज घेतल्याशिवाय रहात नाही.शेतकऱ्याच्या जमिनीचे मूल्य कृषी मूल्य आयोग गृहीत धरत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आशा स्थितीत बँकांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे”-ऍड.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना.

त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”शेतकरी शेतात उत्पन्न काढून विविध पिके पिकवूनही त्याच्या पदरात काही पडत नाही.जादा पिकले तर शेतमालाचे भाव पडतात,नाही पिकले तर दुष्काळाचा सामना करावा लागतो.आशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही बँका आपले व्याज घेतल्याशिवाय रहात नाही.शेतकऱ्याच्या जमिनीचे मूल्य कृषी मूल्य आयोग गृहीत धरत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही अशा स्थितीत विमा कंपन्यांचा आधार वाटायला हवा तर त्याच शेतकऱ्यांना उपटा भरून आपले कोटकल्याण करून घेत असल्याचा धाक अनुभव त्यांच्या वाट्याला येत आहे.राजकीय व्यवस्था व नेते ज्यां शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून निवडणूक लढवतात त्यांच्या कडे निवडून आल्यावर ढुंकूनही पहात नाही ते हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन विधानसभा आणि लोकसभेत बघ्याची भूमिका घेत आहे अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या भांडवलावर उभ्या आहेत अशा सहकारी बँकांनी तरी शेतकऱ्याची व्यथा समजून घेणे असल्याचे औताडे यांनी म्हटले आहे.

तरी पिक कर्जाबाबद अडचणी असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सकाळी साडेदहा वाजता अ नगर जिल्हा सहकारी बँक,मुख्य कार्यालय अ. नगर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी पती-पत्नी दोघांनाही ८-अ प्रमाणे स्वतंत्र पिक कर्ज मिळावे,भोगवटादार वर्ग-२ ला विना जामिन पिक कर्ज मिळावे.सोसायटी बेबाकी असलेल्या व इतर बँका थकबाकी असलेल्या सभासदांना पिककर्ज मिळावे.यासह इतरही शेतकरी समस्येवर चर्चा होणार आहे.तरी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनिल औताडे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close